Amravati University | संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा मोठा निर्णय; उन्हाळी परीक्षा एक जूनपासून

अभियांत्रिकी, तांत्रिकी, फॉर्मसीच्या विद्यापीठ स्तरावरील प्रात्याक्षिक परीक्षा 1 ते 8 जूनदरम्यान होतील. लेखी परीक्षा 10 ते 30 जूनपर्यंत होतील. अभियांत्रिकी, तांत्रिकी, फॉर्मसीच्या महाविद्यालय स्तरावरील प्रात्याक्षिक परीक्षा 1 ते 8 जूनला होतील.

Amravati University | संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा मोठा निर्णय; उन्हाळी परीक्षा एक जूनपासून
उन्हाळी परीक्षा एक जूनपासून Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: May 13, 2022 | 10:23 AM

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या (Sant Gadge Baba Amravati University) उन्हाळी परीक्षा एक जूनपासून घेण्यात येणार आहेत. सर्व परीक्षा ऑफलाइन (Exam Offline) घेण्यावर विद्यापीठाने शिक्कामोर्तब केले आहे. विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेतील कोणतेही प्रश्न सोडवून गुण मिळण्याची मुभा राहणार आहे. विद्यार्थ्यांच्या मागणीनंतर परीक्षेचे स्वरूप बदलले आहे. विद्यापीठात ऑफलाइन परीक्षेची तयारी सुरू झाली आहे. पावणेदोन लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. ऑनलाइन पध्दतीने परीक्षा घेण्याची मागणी असल्याने परीक्षा प्रचलित पध्दतीने होणार आहे. प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी प्रतितासाला 15 मिनिटं वेळ जास्त मिळणार आहे. प्रश्नपत्रिका या बहुपर्यायी (एमसीक्यू) राहतील. विविध विद्यार्थी संघटनाच्या (Students Union) आंदोलनावर विद्यापीठाचा मोठा निर्णय घेतला आहे.

परीक्षांचे वेळापत्रक

अभियांत्रिकी, तांत्रिकी, फॉर्मसीच्या विद्यापीठ स्तरावरील प्रात्याक्षिक परीक्षा 1 ते 8 जूनदरम्यान होतील. लेखी परीक्षा 10 ते 30 जूनपर्यंत होतील. अभियांत्रिकी, तांत्रिकी, फॉर्मसीच्या महाविद्यालय स्तरावरील प्रात्याक्षिक परीक्षा 1 ते 8 जूनला होतील. 10 जून ते 30 जूनदरम्यान लेखी परीक्षा होतील. कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या विद्यापीठ स्तरावरील प्रात्याक्षिक परीक्षा 6 जून ते 15 जूनदरम्यान होतील. तर लेखी परीक्षा 17 जून ते 10 जुलैदरम्यान होतील. तर कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या प्रात्याक्षिक परीक्षा 6 जून ते 15 जूनदरम्यान होतील. लेखी परीक्षा 17 जून ते 19 जुलैदरम्यान होतील.

विद्यार्थ्यांना असणार सवलत

प्रश्नपत्रिकेत किंवा, अथवा असे प्रश्न विद्यार्थी सोडवू शकतील. म्हणजे दोन्ही प्रश्न सोडवू शकतील. या दोन्ही प्रश्नांचे मूल्यांकन होईल. एकूण प्रश्न मिळून प्रश्नपत्रिका 160 गुणांची होत असेल, तर विद्यार्थ्यांना कोणतेही 80 गुणांचे प्रश्न सोडवावे लागतील. यासंदर्भात बोलताना परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक डॉ. हेमंत देशमुख म्हणाले, परीक्षांदर्भात माहिती प्राचार्यांना देण्यात आली आहे. ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येईल. यासंदर्भात नियोजन करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...