भाजपला सर्वात मोठा झटका, तीनवेळा आमदार, माजी गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांचा अमरावतीत पराभव

भाजपचे महाराष्ट्रातील एक नंबरचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे अतिशय जवळचे नेते रणजित पाटील (Ranjit Patil)  यांचा अमरावती पदवीधर निवडणुकीत पराभव झालाय.

भाजपला सर्वात मोठा झटका, तीनवेळा आमदार, माजी गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांचा अमरावतीत पराभव
Follow us
| Updated on: Feb 03, 2023 | 2:48 PM

अमरावती : अमरावती पदवीधर निवडणुकीचा निकाल (Amravati MLC election result) अतिशय आश्चर्यकारक असा लागला आहे. भाजपचे महाराष्ट्रातील एक नंबरचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे अतिशय जवळचे नेते रणजित पाटील (Ranjit Patil)  यांचा अमरावती पदवीधर निवडणुकीत पराभव झालाय. महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे यांनी या निवडणुकीत बाजी मारली आहे. ही निवडणूक अतिशय अटीतटीची ठरली. पण या लढतीत अखेर धीरल लिंगाडे (Dhiraj Lingade) यांनी बाजी मारलीय. विशेष म्हणजे रणजित पाटील हे महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री आहेत. ते याच मतदारसंघातून तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात ते राज्यमंत्री होते. देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय विश्वासू म्हणून त्यांची ख्याती आहे. पण तरीही त्यांचा या निवडणुकीत पराभव झाल्याने भाजपसाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जातोय.

विधान परिषदेच्या दोन पदवीधर आणि तीन शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल कालपासून समोर येतोय. या निवडणुकीत अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या निकालाबाबत शेवटच्या क्षणापर्यंत सस्पेन्स कायम राहिला. विशेष म्हणजे चार जागांचे निकाल कालच जाहीर झाले होते. पण अमरावतीच्या जागेसाठीचा सस्पेन्स कायम होता.

….म्हणून निकाल उशिरा जाहीर

रणजित पाटील यांनी फेरमोजणीची मागणी केली होती. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून फेरमोजणी करण्यात आली. या सगळ्या कार्यप्रणालीला तब्बल 30 तासांपेक्षा जास्त कालावधी लागला. अखेर अमरावती पदवीधर मतदारसंघाचा निकाल जाहीर झालाय. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे धीरल लिंगाडे विजयी झाले आहेत.

हे सुद्धा वाचा

विशेष म्हणजे या निवडणुकीत नाशिकच्या जागेकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. पण नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांचा विजय निश्चित असल्याचं चित्र आज दुपारीच स्पष्ट झालं होतं. तरीही मतमोजणी सुरुच होती.

दुसरीकडे अमरावीत मतदारसंघाची निवडणूक इतकी अटीतटीची ठरेल अशी कुणी कल्पनादेखील केली नव्हती. अखेर या अटीतटीच्या लढतीत महाविकास आघाडीचे उमेदवार धीरल लिंगाडे यांनी बाजी मारली आहे.

रणजित पाटील हे माजी गृहराज्यमंत्री आहेत. देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू अशीदेखील त्यांची ओळख आहे. फडणवीस यांनी रणजित पाटील यांना महाराष्ट्रात दिलेली कोणतीही कामगिरी असो, ती त्यांनी फत्ते पाडली आहे. पण या निवडणुकीत फडणवीसांच्या या शिलेदाराला पराभवाचा सामना करावा लागला.

रणजित पाटील यांच्या पराभवामागील सर्वात मुख्य कारण म्हणजे या निवडणुकीत 14 टक्के मतदान कमी झालं होतं. त्याचाच फायदा धीरज लिंगाडे यांना झालाय.

Non Stop LIVE Update
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.