‘आधी मला बंदुक द्या, कारण मला बंदुकीची जास्त गरज’, भाजप खासदार अनिल बोंडे यांचं धक्कादायक वक्तव्य

"मला बंदुक द्या. कारण मला बंदुकीची जास्त गरज आहे", असं धक्कादायक वक्तव्य अनिल बोंडे यांनी केलं आहे. अनिल बोंडे यांच्या या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अमरावतीत सकल हिंदू समाजाच्या वतीने विराट हिंदू मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चात भाषण करताना अनिल बोंडे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं.

'आधी मला बंदुक द्या, कारण मला बंदुकीची जास्त गरज', भाजप खासदार अनिल बोंडे यांचं धक्कादायक वक्तव्य
अनिल बोंडे यांचं धक्कादायक वक्तव्य
Follow us
| Updated on: Aug 25, 2024 | 4:59 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. “महिलांना बंदुक बाळगण्याची परवानगी द्या. बंदुका मी घेऊन देईन”, असं वक्तव्य अमरावतीत शिंदे गटाचे पदाधिकारी नानकराम नेभनानी यांनी केलं आहे. “दोन-चार लोकांचा जीव गेला तरी चालेल पण वाईट माणूस वाचायला नको”, असं नेभनानी म्हणाले आहेत. नेभनानी यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं त्याच मंचावर भाजपचे खासदार अनिल बोंडे देखील होते. त्यांनी नेभनानी यांच्या वक्तव्याच्या पुढे जावून वक्तव्य केलं. “आधी मला बंदुक द्या. कारण मला बंदुकीची जास्त गरज आहे”, असं अनिल बोंडे म्हणाले आहेत. या दोन्ही नेत्यांच्या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

“मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली आहे की, महिलांना रिव्हॉल्व्हरची परवानगी द्यावी. विशेषत: ते अमरावतीत अमरावतीत परवानगी दिली तर मी माझ्याकडून रिव्हॉल्व्हर घेऊन देईन. त्यांनी आत्मरक्षणासाठी रिव्हॉल्व्हर ठेवावी. दोन-चार चांगल्या लोकांचा जीव जरी गेला तरी चालेल. पण कोणताही वाईट माणूस वाचायला नको. मी त्यांचं समर्थन करेन. कुणाच्या कोर्ट-कचेरीचा खर्च असेल तोही मी करेन”, असं शिंदे गटाचे पदाधिकारी नानकराम नेभनानी म्हणाले.

अनिल बोंडे काय म्हणाले?

नानकराम नेभनानी यांच्या विधानावाचा दाखला देत अनिल बोंडे यांनी आपलं वक्तव्य केलं आहे. “आता नेभनानी म्हणत होते प्रत्येकाकडे रिव्हॉल्व्हर देतो. इतरांना द्याचं की नाही ते मला माहिती नाही. पण आधी मला द्या. कारण मला आता जास्त गरज आहे”, असं वक्तव्य अनिल बोंडे यांनी केलं. बांगलादेशात हिंदूंवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात निषेध व्यक्त करण्यासाठी आज अमरावतीत सकल हिंदू समाजाच्या वतीने विराट हिंदू मोर्चा काढण्यात आला. अमरावती शहरात नेहरू मैदान ते इर्विन चौक असा मोर्चा निघाला. या मोर्चानिमित्त सभादेखील पार पडली. या मोर्चा आणि सभेत हिंदुत्ववादी संघटना सहभागी झाल्या होत्या. माजी खासदार नवनीत राणा आणि भाजपचे राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे हे देखील उपस्थित होते. यावेळी शिंदे गटाच्या नेत्याने केलेल्या वक्तव्यावर अनिल बोंडे यांनी मला बंदुक द्या, असं वक्तव्य केलं.

“सर्वांना लढता आलं पाहिजे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी अग्निविर सारख्या योजना आणल्या. पण विरोधक त्याला विरोध करतात. कारण काँग्रेसला भारताचा बांगलादेश करायचा आहे. हिंदूंवर अत्याचार करायचा आहे हे काँग्रेसचे म्हणणं आहे”, अशी टीका अनिल बोंडे यांनी केली. “तुमच्या कारखान्यात स्वस्त मजुरी द्यावी लागते म्हणून बांगलादेशातील रोहिंग्यांना ठेवू नका”, असं आवाहन अनिल बोंडे यांनी व्यापाऱ्यांना केलं.

“मंदिर कोणी तोडले, बुद्धांच्या मूर्ती कोणी तोडल्या तर त्या बादशाहांनी. असं कधी ऐकलं का की कुठल्या हिंदूंनी कुठल्या मंदिर मस्जिदवर हल्ला केला? जिथे कुठे मंदिर असेल तिथे सात वाजता सर्वांनी आरतीसाठी एकत्र यावं. प्रवासात असाल तर जवळच्या मंदिरात गोळा व्हा”, असं आवाहन बोंडेंनी केलं. “लव्ह जिहाद लँड जिहाद होत असेल तर धावून जा. हिंदूंना जागण्याची वेळ आहे. हिंदू जागला तर खतरनाक होतो हे बांगलादेशातल्या हिंदूंनी दाखवून दिलं आहे”, असं अनिल बोंडे म्हणाले.

अनिल बोंडे आणखी काय-काय म्हणाले?

“प्रत्येकाच्या हृदयात ही चिंगारी पाहिजे. दिवस कठीण आहेत. 1971 साली बांगलादेशात 7 कोटी हिंदू होते. आता किती राहिले तर एक कोटी. काहींना मारलं गेलं, काहींचं धर्मांतर करण्यात आलं. हिंदू जागत नाही, मग सात कोटींचा एक कोटी होतात. बांगलादेशच्या पंतप्रधान यांचं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अभिनंदन केलं. पण हिंदूंवर अत्याचार होणार नाही याच्याही सूचना केल्या. राफावर दुःख व्यक्त करणाऱ्यांना हिंदूंवरील अत्याचार दिसत नाहीत का?” असा सवाल बोंडेंनी केला.

“बदलापुरात दोन मुलींवर अत्याचार झाले, हिंदू कधी दुर्योधन दुशासनाचा सन्मान करत नाही. महाविकास आघाडीला मला एकच सवाल करायचा आहे, उरणमध्ये यशश्री शिंदेवर अत्याचार झाला त्यावेळेला तुम्ही रस्त्यावर का उतरले नाही? बदलापुरातील अत्याचार करणाऱ्याला फाशी होईल. अमरावतीत एका मुलीचा विनयभंग करण्यात आला, पीडित मुलीच्या कुटुंबीयांना त्रास देण्यात आला. त्यावेळी काँग्रेसचा कोणताही माणूस मदतीसाठी समोर आला नाही. त्यासाठी विश्व हिंदू परिषदेच्या पोरांना आवाज द्यावा लागतो. यांना झेड प्लस देऊ नका पण पीडित कुटुंबीयांच्या घराला संरक्षण द्या”, असं अनिल बोंडे म्हणाले.

जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.