AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गाडी जाळपोळ प्रकरण, खासदार अनिल बोंडे यांनी केली या आमदाराच्या नार्को टेस्टची मागणी

शंभर टक्के चौकशी करा. ज्या टेस्ट करायच्या आहे त्या टेस्ट करा. दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या.

गाडी जाळपोळ प्रकरण, खासदार अनिल बोंडे यांनी केली या आमदाराच्या नार्को टेस्टची मागणी
अनिल बोंडे, खासदार
Follow us
| Updated on: Jan 05, 2023 | 6:51 PM

अमरावती : गाडी जाळपोळ प्रकरणी दूध का दूध आणि पाणी का पाणी झालं पाहिजे. असं वाटत असेल तर देवेंद्र भुयार यांनी स्वतःच पोलिसांसमोर जावं. आपली नार्को टेस्ट करून घ्यावी, असा सल्ला खासदार अनिल बोंडे यांनी दिला. गाडी जाळण्याचे प्रकरण देवेंद्र भुयार यांनीच रचलं होतं. ती सर्व नौटंकी ही सहानुभूती मिळवण्याची प्रक्रिया होती. असा गंभीर आरोप भाजप खासदार अनिल बोंडे यांनी आमदार देवेंद्र भुयार यांच्यावर लावला. निवडणुकीत केवळ सहानुभूती मिळवण्यासाठी गाडी जाळपोळचा प्रकार झाला. गाडी जाळपोळचा प्रकार त्यांनी स्वतः घडवून आणला होता. लोकशाही प्रक्रियेला काळीमा फासणारा व्यक्ती विधानसभेत जाणे योग्य नाही. जनभावनेचा आदर करून या प्रकरणाची निश्चित चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणीही अनिल बोंडे यांनी केली.

महाविकास आघाडी सरकार मध्ये हे प्रकरण दाबल्या गेलं होतं. मी माझी तक्रार पोलीस अधीक्षक यांना दिली होती. अशी माहितीही अनिल बोंडे यांनी दिली.

शंभर टक्के चौकशी करा. ज्या टेस्ट करायच्या आहे त्या टेस्ट करा. दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या. गाडी जाळपोळ प्रकरणी नार्को टेस्ट व सीबीआय चौकशीची मागणी झाल्यानंतर देवेंद्र भुयार यांनी ही प्रतिक्रिया दिली.

मी दुसऱ्यांसाठी भांडू शकतो. मी माझ्यासाठी भांडू शकत नाही. माझ्यासाठी जे उपोषण करत आहे त्यांना मनापासून माझ्या शुभेच्छा. हे जाळपोळ प्रकरण झाल्यानंतर न्यायालयाने आमचे सहाव्या दिवशी बयाण नोंदवले. मला न्यायालयाने सांगितलं की या प्रकरणाची कुठेही वाच्छता करू नये, असंही देवेंद्र भुयार यांनी सांगितलं. मी सभागृहात देखील हा प्रश्न मांडला होता, असंही ते म्हणाले.

२०१९ मध्ये देवेंद्र भुयार यांच्या वाहनावर अज्ञातांनी गोळीबार केला होता. त्यानंतर वाहन पेटवून दिले अशी तक्रार देवेंद्र भुयार यांच्या चालकानं पोलिसांत केली होती. आता वरुड येथे सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आमदार भुयार यांच्या नार्को टेस्टच्या मागणीसाठी उपोषणावर बसले आहेत.

भारत- पाकिस्तान दोघांनी शांतता राखावी; यूएनएससीचं आवाहन
भारत- पाकिस्तान दोघांनी शांतता राखावी; यूएनएससीचं आवाहन.
भारतात उद्या युद्धाचा सायरन वाजणार, आशियाई देशाचं मॉक ड्रिलकडे लक्ष
भारतात उद्या युद्धाचा सायरन वाजणार, आशियाई देशाचं मॉक ड्रिलकडे लक्ष.
आमच्या हाती काय बंदुका देणार? मॉक ड्रिलवरून राऊतांचा सरकारला खोचक सवाल
आमच्या हाती काय बंदुका देणार? मॉक ड्रिलवरून राऊतांचा सरकारला खोचक सवाल.
देशव्यापी मॉक ड्रिल, आपत्कालीन परिस्थितीत कराल? तज्ज्ञांनी सांगितलं...
देशव्यापी मॉक ड्रिल, आपत्कालीन परिस्थितीत कराल? तज्ज्ञांनी सांगितलं....
भारतासोबत युद्ध झालं तर अवघ्या 100 तासांत पाकिस्तानचे 5 तुकडे, कारण...
भारतासोबत युद्ध झालं तर अवघ्या 100 तासांत पाकिस्तानचे 5 तुकडे, कारण....
चोरीला गेलेलं बाळ सुखरूप आईच्या कुशीत, पोलिसांकडून 48 तासात शोध अन्...
चोरीला गेलेलं बाळ सुखरूप आईच्या कुशीत, पोलिसांकडून 48 तासात शोध अन्....
युद्धाची पूर्व तयारी, गृहमंत्रालयाचे सर्व राज्यांना आदेश; 7 मे रोजी...
युद्धाची पूर्व तयारी, गृहमंत्रालयाचे सर्व राज्यांना आदेश; 7 मे रोजी....
पाक पंतप्रधान गायब, पत्रकाराचा सवाल अन् उपपंतप्रधानांचं उत्तर बघा काय
पाक पंतप्रधान गायब, पत्रकाराचा सवाल अन् उपपंतप्रधानांचं उत्तर बघा काय.
मुंबईकरांनो... तुम्ही बेस्ट बसने प्रवास करतात? तुमच्यासाठी मोठी बातमी
मुंबईकरांनो... तुम्ही बेस्ट बसने प्रवास करतात? तुमच्यासाठी मोठी बातमी.
वैभवी देशमुखला मुख्यमंत्र्यांचं पत्र अन् बारावीचे गुण कळताच म्हणाले...
वैभवी देशमुखला मुख्यमंत्र्यांचं पत्र अन् बारावीचे गुण कळताच म्हणाले....