AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bachchu Kadu म्हणतात आयुक्तांवर फेकलेल्या शाहीचे परिणाम भोगावे लागतील

Bachchu Kadu म्हणतात आयुक्तांवर फेकलेल्या शाहीचे परिणाम भोगावे लागतील

| Updated on: Feb 10, 2022 | 8:15 PM

अमरावती शहरात 12 जानेवारीला शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला होता, हा पुतळा बसवताना महानगरपालिकेची परवानगी घेतली नसल्याने मनपा आयुक्त आष्टीकर यांनी तो काढला होता. त्यानंतर रवी राणा समर्थकांकडून आयुक्तांवर शाहीफेक करण्यात आली आहे.

अमरावती शहरात 12 जानेवारीला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला होता, हा पुतळा बसवताना महानगरपालिकेची परवानगी घेतली नसल्याने मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर यांनी तो काढला होता. त्यानंतर रवी राणा समर्थकांकडून आयुक्तांवर शाहीफेक करण्यात आली. याप्रकरणावर आमदार बच्चू कडूंनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, शाही फेक करणे चुकीची असून हे कुणी केले असेल त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा वापर करून असे कृत्य केले जात असेल चुकीचे आहे असे मतही त्यांनी व्यक्त केले. हे प्रकरण एवढे मोठे नसतानाही आणि आयुक्तांकडून चालढकलही करण्यात आली नाही तरीही त्यांच्यावर शाहीफेक करण्यात आली आहे.

 

Published on: Feb 10, 2022 08:04 PM