Video Vidarbha Weather | विदर्भात संध्याकाळी वातावरण ढगाळलेलं; अमरावतीत पावसाच्या सरी कोसळल्या!
नागपुरातही सायंकाळी पाचच्या सुमारास आकाश ढगाळलेलं होतं. वादळ वारा सुटला होता. पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. नागपूरच्या तापमानातही आज घट झाली.
अमरावती : आज अचानक दुपारी 5 वाजता दरम्यान वादळ आलं. अमरावतीच्या (Amravati) काही भागात जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. मेघगर्जनेसह दर्यापूर तालुक्यात (Daryapur Taluka) मोचरडा येथे तब्बल 20 मिनिटे पावसाच्या सरी कोसळल्यात. अचानक झालेल्या पावसाने नागरिकांना उकाळ्यापासून मात्र काहीसा दिलासा मिळाला आहे. सद्या ढगाळ वातावरण असल्याने पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. आज अमरावतीचं तापमान ४२.६ अंश डिग्री सेल्सीअस होतं. पाऱ्यात घसरण झालेली पाहायला मिळाली. त्यात पावसानं हजेरी लावल्यानं नागरिकांना तापमानापासून थोडासा दिलासा मिळाला. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव (Malegaon) तालुक्यातील शिरपूर जैन परिसरात पावसाचा हलक्या सरी कोसळल्या. उकाळ्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला.
नागपुरातही ढगाळ वातावरण
नागपुरातही सायंकाळी पाचच्या सुमारास आकाश ढगाळलेलं होतं. वादळ वारा सुटला होता. पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. नागपूरच्या तापमानातही आज घट झाली. 43.3 डिग्री सेल्सीअस तापमान आहे. हवामान विभागानं ढगाळ वातावरण राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. तसेच काही ठिकाणी तुरळक स्वरुपात पाऊसही पडल्याची माहिती आहे. वादरळवारं चांगलच सुटलंय. उद्याही आकाश ढगाळलेलं राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय.
पाहा व्हिडीओ
अमरावती येथे आज सायंकाळी पाचच्या सुमारास सुसाट्याचा वारा सुटला. पाऊस पडला. pic.twitter.com/H3QMRYUeGc
— Govind Hatwar (@GovindHatwar) May 3, 2022
चंद्रपुरात पारा 45.2 अंशांवर
चंद्रपुरात मात्र तापमानाचा पारा 45.2 डिग्री सेल्सीअस होता. तरीही संध्याकाळी आकाशात ढग दाटून आले. वादळवारं सुटलं होतं. उद्याही चंद्रपूर जिल्ह्यात हवामान विभागानं ढगाळ वातावरण राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केलाय. यवतमाळ जिल्ह्यात पारा 42 डिग्री सेल्सीअसवर थांबला. संध्याकाळी ढगाळ वातावरण होतं. काही ठिकाणी वादळ सुटलं होतं. अशीच काहीशी परिस्थिती संपूर्ण विदर्भात आहे. उन्हाच्या लाहीलाहीपासून थोडाफार दिलासा नागरिकांना मिळाला. उद्याही विदर्भात आकाश ढगाळलेलं राहणार असून, वादळासह पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे.