वर्षभरापूर्वी प्रेमविवाह, दाम्पत्य दोन दिवसांपासून घरून बेपत्ता, धक्कादायक माहिती आली समोर
विकी हा ट्रॅक्टरवर चालकाचे काम करत होता. दोन दिवसांपासून ते गावातून बेपत्ता होते. या दोघांचेही मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे.
स्वप्निल उमप, प्रतिनिधी, अमरावती : विकी आणि तुलसी दोघांचे प्रेम होते. हे गावात माहीत झाल्यावर समाजबांधवांनी मागच्या वर्षी त्यांचे लग्न लावून दिले. तेव्हापासून सुखाचा संसार सुरू होता. वर्षभर त्यांनी संसाराचा रहाटगाडगा चालवला. पण, त्यांच्या संसाराला कुणाची नजर लागली माहीत नाही. गेल्या दोन दिवसांपासून ते बेपत्ता होते. त्या दोघांचे मृतदेह सापडले. त्यामुळे खळबळ उडाली आहे. अमरावती जिल्ह्यातील धारणी मार्गावरील वझ्झर येथील सपन प्रकल्पात पती-पत्नीचा मृतदेह आढळला. चिखलदरा तालुक्यातील चिचखेडा येथील हे जोडपे मंगळवारी दुपारपासून दुचाकीने घरून निघाले होते. विकी बारवे (वय २३) आणि तुलसी बारवे (वय २१) अशी मृत पती-पत्नीची नावे आहेत.
विकी चालवायचा ट्रॅक्टर
विकी हा ट्रॅक्टरवर चालकाचे काम करत होता. दोन दिवसांपासून ते गावातून बेपत्ता होते. या दोघांचेही मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. पोलीस मृत्यूच्या कारणांचा तपास घेत आहेत. घटनास्थळी दुचाकी आढळून आली.
दोघांचेही मृतदेह सापडले
दोघेही दुचाकीने आल्याचे स्पष्ट झाले आहे. विकी आणि तुलसी दोघेही चिचखेडा गावातील रहिवासी आहेत. ते दोघेही एकाच समाजाचे आहेत. दोघांचे प्रेम होते. त्यानंतर त्यांनी लग्न केले. वर्षभर एकत्र संसार केला. पण, आता त्यांचे मृतदेह सापडले. त्यांचा मृत्यू कसा झाला हे पोलीस तपासानंतरच समोर येईल.
मुलगी, जावई बेपत्ता असल्याची तक्रार
चिचखेडा येथील रेशन दुकानदार आणि मुलीचे वडील सायबू उमरकर यांना दोन मुलगी आणि जावई घरी नसल्याचे लक्षात आले. या दोघांचेही मोबाईल स्वीच ऑफ येत होते. याची माहिती त्यांनी पोलीस पाटील बब्बू अजनेरिया यांना दिली. चिखलदार पोलिसांत तक्रार करण्यात आली.
महिलांना बंद मोबाईल दिसला
विकी आणि तुलसी यांचे संबंध आले. दोघेही एकाच समाजाचे होते. त्यामुळे समाजबांधवांनी त्यांचे लग्न लावून दिले. मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिलांना बंद असलेला मोबाईल आढळला. तो सुरू करून पोलीस पाटील बब्बू अजनेरीय यांनी त्यावर संवाद साधला. प्रकल्प स्थळावरील चौकीदाराला कळवले. घटनास्थळी दुचाकी आणि दोघांचे मृतदेह सापडले. परतवाड्याचे ठाणेदार संदीप चव्हाण तपास करत आहेत.