Ravi Rana on Hanuman Chalisa | हनुमान मंदिरांना भोंग्याचे मोफत वाटप, अमरावतीत आमदार रवी राणा यांची घोषणा, आज नेमकं काय होणार?
हनुमान मंदिरांना भोंग्यांचं वाटप करणार असल्याचं आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी जाहीर केलं. काल रात्री युवा सेनेचे कार्यकर्ते रवी राणा यांच्या घरासमोर धडकले होते. त्यामुळं आज भोंगे वाटप करताना काय होते, याकडे उत्सुकता लागून राहिली आहे. पोलिसांनी शहरात सुरक्षा व्यवस्था वाढविली आहे.
अमरावती : भाजप नेते मोहित कंबोज यांनी हनुमान मंदिरांवर हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) लावण्यासाठी मोफत भोंगे वाटणार असल्याची घोषणा केली. आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनीदेखील मोफत भोंगे वाटणार असल्याची घोषणा केली होती. त्याच पार्श्वभूमीवर आज रवी राणा आणि नवनीत राणा हे भोंगे वाटप करणार आहे. रवी राणा यांच्या घरी या भोंग्यांचे वाटप करण्यात येणार आहे. आज हनुमान जयंती आहे. या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी हनुमान चालीसाचं पठण होणार आहे. पण, यासोबतच हनुमान मंदिरांना भोंग्यांचं वाटप करणार असल्याचं आमदार रवी राणा यांनी जाहीर केलं. काल रात्री युवा सेनेचे कार्यकर्ते रवी राणा यांच्या घरासमोर धडकले होते. त्यामुळं आज भोंगे वाटप करताना काय होते, याची उत्सुकता लागून राहिली आहे. पोलिसांनी शहरात सुरक्षा व्यवस्था वाढविली आहे. आमदार रवी राणा यांच्या घरासमोर युवा सेनेने हनुमान चालीसा वाजवली. युवा सेनेच्या आंदोलनानंतर आमदार रवी राणांच्या घरासमोर युवा स्वाभिमानचे कार्यकर्ते जमले. युवा सेनेचे कार्यकर्ते पहाटे आले असते तर त्यांचं स्वागत केलं असतं. कारण हनुमानाचा जन्म सकाळी साडेपाच वाजता झाला, अशी प्रतिक्रिया युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी दिली. युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी हनुमान चालीसा (Hanuman Temple) वाचण्याची हिंमत दाखवली नाही. केवळ फोटोशेषण केलं. युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी सकाळी यावे आम्ही त्यांचे स्वागत करू, असंही युवा स्वाभिमानचे कार्यकर्ते म्हणाले.
युवा सेनेचे कार्यकर्ते राणांच्या घरासमोर धडकले
आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांच्या घरासमोर हनुमान चालीसा वाजवल्या प्रकरणी शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आमदार रवी राणा यांच्या आव्हानाला प्रत्युत्तर देण्यासाठी रवी राणा यांच्या घरासमोर शिवसैनिक आले होते. यावेळी युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्यकर्त्यांनी गांधीगिरी केली. सगळ्या निदर्शन करणाऱ्या शिवसैनिकांना शरबत देऊ केलं. पण यावेळी पोलिसांनी रोखलं. आमदार रवी राणा यांनी हनुमान चालीसा पठणावरून मुख्यमंत्र्यांना दिलेल्या आव्हानाला शिवसेनेकडून चोख प्रतीउत्तर देण्यात आलं. आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्या गंगा सावित्री निवासस्थानासमोर शिवसेना कार्यकर्ते कार्यकर्ते साउंडवर हनुमान चालीसा वाजवत आहेत. आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्र्यांना आव्हान दिल्यानंतर वाद निर्माण झालाय.
यशोमती ठाकूर म्हणतात, मक्तेदारी समजू नका
राज ठाकरे यांना असंतोष निर्माण करायचा आहे. पण आम्ही तसं होऊ देणार नाही. हा उत्सव आहे तो आम्ही साजरा करतोय. काही लोक असं दाखवत आहे की हिंदु धर्मावर त्यांचीच मक्तेदारी आहे. आम्ही धर्म पाळतो आणि मानतो. कोणीही स्वतःची मक्तेदारी समजू नये. काही जण असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. या रॅलीत सर्वच धर्माचे लोक आहेत, असं मत मंत्री यशोमती ठाकून यांनी व्यक्त केलंय.
पोलिसांचा तगडा बंदोबस्त
हनुमान जयंतीच्या पूर्वसंध्येला अमरावती शहर काँग्रेस पक्षाकडून अमरावती शहरात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. वेगवेगळे देखावेदेखील साकारण्यात आले आहेत. ढोल पथक ताशाच्या निनादात या रॅलीला सुरवात झाली आहे. दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त अमरावती शहरातील गांधी चौक, राजकमल चौकात लावला आहे.