Video Navneet Rana | हनुमान जयंतीला हनुमान चालीसा पठण करणार, मंदिरावर भोंगे लावणार; खासदार नवनीत राणा यांचे वक्तव्य
उद्या हनुमान जयंती आहे. त्यानिमित्तानं उत्साहाचं वातावरण आहे. खासदार नवनीत राणा यांनी हनुमान जयंतीला आम्ही दोघे (रवी राणांसोबत) हनुमान चालीसा पठण करणार असल्याचं सांगितलं. शिवाय भोंगेही वाजविणार असल्याचं जाहीर केलं.
अमरावती : येत्या हनुमान जयंतीला हनुमान मंदिरात जाऊन मी आणि आमदार रवी राणा आम्ही दोघेही हनुमान चालीसाचे (HanumanChalika) पठण करणार आहोत. तसेच हनुमान मंदिरावर भोंगा देखील लावणार आहो, असं वक्तव्य अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केलं आहे. दोनच दिवसांपूर्वी खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांनी रवीनगरमधील (Ravinagar) हनुमान मंदिर परिसरात सुरू असलेल्या एका धार्मिक कार्यक्रमात गेले. हजारो महिलांसोबत दोन तास बसून हनुमान चालीसाचे पठण केल्याने त्या चर्चेत आल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा हनुमान जयंतीला मंदिरात जाऊन हनुमान चालीसा पठण करून मंदिरावर भोंगा सुद्धा लावणार असल्याचं नवनीत राणा यांनी म्हटलं आहे.
ही काही पहिली वेळ नाही
खासदार नवनीत राणा म्हणाल्या, हनुमान चालीसा वाचणे ही काही माझी पहिली वेळ नाही. मी पहिल्यांदा हनुमान चालीसा वाचली नाही. अनेक वेळा हनुमान चालीसा वाचली आहे. आपल्या संस्कृतीला पुढे नेण्याचं काम करत आहे. दरवर्षी रवीनगरमध्ये हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम होत असल्याचंही खासदार नवनीत राणा यांनी सांगितलं. उद्या हनुमान जयंती आहे. त्यानिमित्तानं उत्साहाचं वातावरण आहे. खासदार नवनीत राणा यांनी हनुमान जयंतीला आम्ही दोघे (रवी राणांसोबत) हनुमान चालीसा पठण करणार असल्याचं सांगितलं. शिवाय भोंगेही वाजविणार असल्याचं जाहीर केलं. मनसेला हनुमान चालीसा वाचण्यासाठी राज्य सरकारनं परवानगी नाकारली होती. यावरून वाद निर्माण झाला. आता उद्या हनुमान जयंती आहे. यानिमित्त पुन्हा हनुमान चालीसाचे पठण ठिकठिकाणी होणार आहे. यात खासदार नवनीत राणा यांनी आता उडी घेतली. आम्ही नेहमीप्रमाणे हनुमान चालीसा वाचणार असल्याचं राणा यांनी आजच जाहीर केलं.