Video : Amravati Rain Damage | अमरावतीत पावसाचं थैमान, शिरजगावात मूसळधार, रस्त्यावर गुडघाभर पाणी, दुचाक्या गेल्या वाहून

बाजार समितीत विकण्यासाठी शेतमाल ठेवण्यात आला होता. त्या शेतमालाची धूळधाण होताना दिसली. तुरी ओल्या झाल्या. त्यांना आता कोंब फुटतील. मग, त्या खरेदी कोण करणार असा प्रश्न निर्माण झाला. पोत्यांमध्ये असलेला माल खराब झाला. ताडपत्रीनं झाकून ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

Video : Amravati Rain Damage | अमरावतीत पावसाचं थैमान, शिरजगावात मूसळधार, रस्त्यावर गुडघाभर पाणी, दुचाक्या गेल्या वाहून
अमरावतीत पावसाचं थैमान, शिरजगावात मूसळधारImage Credit source: t v 9
Follow us
| Updated on: Jun 19, 2022 | 10:57 AM

अमरावती : विदर्भात (Vidarbha) पावसानं चांगलीच हजेरी लावली. त्यातच्या त्यात अमरावती जिल्ह्यातल्या शिरजगावात (Shirajgaon) मूसळधार कोसळला. काल दिवसभर पाऊस धो-धो बरसला. ढगफुटी सदृश्य परिस्थिती गावात निर्माण झाली. त्यामुळं गावाशेजारील तलाव, नाले भरले. नद्यांमध्ये पाणी वाहू लागले. एवढंच काय तर गावातील रस्त्यांवर तुडूंब पाणी वाहू लागले. घरांमध्ये पाणी शिरले. रस्त्यावर ठेवलेल्या गाड्या वाहून गेल्या. चालायच्या रस्त्यांवर गावात गुडघाभर पाणी वाहत होते. काहींच्या घरातील भांडीकुंडी या रस्त्यावरील पाण्यानं वाहूनं नेली. या जोरदार पावसानं नागरिकांची (Citizen) चांगलीच तारांबळ उडाली. रस्त्यावरील गाड्या सांभाळताना कसरत करावी लागत होती. पाण्यासाठी असलेले पाईपलाईन काही ठिकाणी फुटली. गावातील नाल्या चोक झाल्या होत्या.

पाहा पुराचा व्हिडीओ

गावातील रस्त्यांना पूर

कसबा गावातील नाले तुडूंब भरून वाहू लागले. ही पावसाची सुरुवात आहे. जिथं पाऊस बरसतो, तिथं नदी-नाल्यांना पूरसदृश्य परिस्थिती सुरू झाली आहे. या पावसानं साप सुरक्षित मार्ग शोधण्यासाठी घरांचा आश्रय घेताना दिसले. त्यामुळं भीती आणखीनच वाढली. लहान मुलं रस्त्यावर खेळू शकत नाही. असा प्रयत्न करणारे रस्त्यानं वाहून जाताना दिसले. गावकऱ्यांना त्यांना सुरक्षित बाहेर काढले. आपआपल्या दुचाकी सुरक्षित ठेवताना नागरिकांची दमछाक होत होती. दुचाकाची रस्त्यावरील पाण्यात वाहून जात असताना एका व्यक्तीला सांभाळेना, अशी परिस्थिती होती. दुचाकी सांभाळण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीची मदत घ्यावी लागत होती.

हे सुद्धा वाचा

शेतमालाचे नुकसान

बाजार समितीत विकण्यासाठी शेतमाल ठेवण्यात आला होता. त्या शेतमालाची धूळधाण होताना दिसली. तुरी ओल्या झाल्या. त्यांना आता कोंब फुटतील. मग, त्या खरेदी कोण करणार असा प्रश्न निर्माण झाला. पोत्यांमध्ये असलेला माल खराब झाला. ताडपत्रीनं झाकून ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण, तो अपुरा पडला. उघड्यावर असलेल्या धान्याची नासाडी झाली. चन्याला कोंब फुटले. तेही खराब झाले. पहिलाच पाऊस पाहून नागरिक घाबरले. आणखी किती जोराचा पाऊस येणार. ही ढगफुटी तर नाही, अशी भीती नागरिकांमध्ये पसरली आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.