Marathi News Maharashtra Amravati How did hanuman get the name hanuman read the answer given by mp navneet rana to the interviewer au128
Video Navneet Rana | हनुमानाचं नाव हनुमान कसं पडलं? खासदार नवनीत राणांनी मुलाखतकाराला काय दिलं उत्तर वाचा…
हनुमान बालक असताना नटखट होते. त्यांनी सूर्याला गिळंकृत केलं होतं. स्वतःच्या तोंडात घेतलं होतं. यामुळं जगात अंधकार माजला होता. याची माहिती इंद्रदेवाला झाली. तेव्हा ते खूप रागावले. त्यांनी वज्राने हनुमानाच्या हनुवटीवर वार केला. त्यामुळं हनुमान यांची हनुवटी थोडी तिरपी झाली. संस्कृतमध्ये हनु आणि मान म्हणजे थोडी तिरपी होणे. तेव्हापासून त्यांचं नाव हनुमान असं ठेवण्यात आलं.
नागपूर : हनुमान चालिसावरून खासदार नवनीत राणा चर्चेत आल्या. त्यांनी मुख्यमंत्र्यांनी हनुमान चालिसा वाचून राज्यावरील संकट दूर करावं, असं आवाहन केलं. पण, मुख्यमंत्र्यांनी काही हनुमान चालिसा वाचला नाही. मात्र, हनुमानाचं नाव हनुमान कसं पडलं, असा प्रश्न एका मुलाखतकारानं ( Interviewer) नवनीत राणा यांना विचारला. नवनीत राणा यांना एका टीव्ही अँकरनं एक प्रश्न विचारला. त्या म्हणाल्या, तुम्ही हनुमानजींच्या भक्त आहात. मग सांगा हनुमान यांचं नाव हनुमान असं कसं पडलं. यावर नवनीत राणा म्हणाल्या, हनुमान रामाचे भक्त (Devotee of Hanuman Rama) होते. सेवक होते. हनुमान यांचं नाव सुरुवातीला हनुमान नव्हतं. मग, त्यांचं नाव हनुमान असं कसं पडलं. यावर नवनीत राणा म्हणाल्या, तुम्ही इतिहासात (History) नेत असाल, तर त्यांचा इतिहासही पुन्हा वाचला जाईल. पण, हनुमान चालिसा मी वाचते. त्याबद्दल मी सांगू शकतो.
यावर मुलाखतकार म्हणाल्या, नवनीतजी मी तुम्हाला सांगते की, हनुमानाचं नाव हनुमान कसं पडलं. हनुमान बालक असताना नटखट होते. त्यांनी सूर्याला गिळंकृत केलं होतं. स्वतःच्या तोंडात घेतलं होतं. यामुळं जगात अंधकार माजला होता. याची माहिती इंद्रदेवाला झाली. तेव्हा ते खूप रागावले. त्यांनी वज्राने हनुमानाच्या हनुवटीवर वार केला. त्यामुळं हनुमान यांची हनुवटी थोडी तिरपी झाली. संस्कृतमध्ये हनु आणि मान म्हणजे थोडी तिरपी होणे. तेव्हापासून त्यांचं नाव हनुमान असं ठेवण्यात आलं. तुम्ही हनुमान भक्त आहात मग तुम्ही हे वाचलं नाही का, यावर नवनीत राणा म्हणाल्या, लहानपणापासून आम्ही हनुमान चालिसा म्हणतो. संकटं येतात तेव्हा आम्ही हनुमान चालिसा म्हणतो. आता इतिहासाचं वाचन करणार असल्याचं नवनीत राणा यांनी सांगितलं.