Amravati Accident | अमरावतीमध्ये खासगी बस नाल्यात पलटली! बसमध्ये 40 पेक्षा जास्त प्रवासी

ही खाजगी बस नाल्यात पलटी झाल्याची घटना अमरावती-नागपूर महार्गावर अमरावती शहरातील अर्जुन नगर परिसरात घडली. सुदैवाने दैव बलवत्तर म्हणून या अपघातात काही प्रवासी किरकोळ जखमी झालेत. कुठलीच जीवितहानी झाली नाही.

Amravati Accident | अमरावतीमध्ये खासगी बस नाल्यात पलटली! बसमध्ये 40 पेक्षा जास्त प्रवासी
अमरावतीमध्ये खासगी बस नाल्यात पलटल्याने झालेला अपघात.
Follow us
| Updated on: Feb 25, 2022 | 12:26 PM

स्वप्निल उमप

अमरावती : अमरावतीत खाजगी बस नाल्यात पलटली. काही प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. अमरावतीवरून मोर्शीमार्गे (Amravati-Morshi) मध्य प्रदेशकडे ही बस जात होती. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. सर्व प्रवासी सुखरूप आहेत. बसमध्ये 40 पेक्षा अधिक प्रवासी होते. अमरावती-नागपूर महामार्गावरील (Amravati-Nagpur Highway) अर्जुननगर परिसरातील घटना ही घटना घडली. काळ आला होता पण वेळ आली नव्हती. या वाक्याला तंतोतंत शोभेल अशी घटना अमरावतीमध्ये घडली. अमरावतीवरून मोर्शीमार्गे मध्यप्रदेशमधील बैतुलकडे (Betul in Madhya Pradesh ) एक खासगी बस जात होती. ही खाजगी बस नाल्यात पलटी झाल्याची घटना अमरावती-नागपूर महार्गावर अमरावती शहरातील अर्जुन नगर परिसरात घडली.

जखमी प्रवासी रुग्णालयात

सुदैवाने दैव बलवत्तर म्हणून या अपघातात काही प्रवासी किरकोळ जखमी झालेत. कुठलीच जीवितहानी झाली नाही. बसमध्ये जवळपास चाळीसपेक्षा जास्त प्रवासी होते. बस पूर्ण क्षमतेने होती. दरम्यान, किरकोळ जखमी असलेल्या प्रवाशांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतले. त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेले आहे. दरम्यान, एसटी महामंडळच्या बस बंद आहेत. त्यामुळं मोठ्या प्रमाणावर अमरावती शहरात अवैधपणे खासगी वाहतूक सुरू आहे.

खासगी बस खचाखच भरली होती

आज सकाळी अकरा वाजताच्या सुमारास मध्यप्रदेशमधील होशगांबाद येथील एक खासगी बस अमरावतीमधून मोर्शीमार्गे मध्यप्रदेशमध्ये प्रवासी घेऊन जात होती. सध्या एसटी बस बंद आहेत. त्यामुळं ही खासगी बस खचाखच प्रवाशांनी भरून होती. अशातच अमरावती शहरात अर्जुन नगर परिसरात ही बस येताच रोडच्या कडेला असलेल्या एका नाल्यात पलटी झाली. लहान चिमुकले बचावले. अपघाताचे कारण अस्पष्ट आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला, असावा असा अंदाज आहे.

Nagpur Court | शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या संस्थानातील घोटाळ्याचा गुन्हा कायम, काय आहे प्रकरण?

Nagpur RSS | श्रीलंकन उच्चायुक्त मिलिंदा मोरागोडा यांची संघ मुख्यालयाला भेट, डॉ. मोहन भागवतांशी काय हितगूज?

नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांनी नोंदविला दुप्पट सहभाग, मनरेगातील कोणत्या योजनेत घेत आहेत पुढाकार?

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.