Navneet Rana | अमरावतीत राणा दाम्पत्याच्या स्वागताची कुटुंबीयांकडून जय्यत तयारी, तर शिवसेनेकडून राणांविरोधात पोस्टरबाजी
छत्तीस दिवस पाखडले काहीच नाही सापडले. शेवटी आले येथेचं, अशाप्रकारचे पोस्टर लावण्यात आले आहेत. राणा दाम्पत्याविरोधात हे पोस्टर अमरावतीत लावण्यात आले आहेत. शिवसेनेचे पराग गुढगे यांनी हे पोस्टर लावलेले आहेत. छत्तीस दिवस राणा दाम्पत्य अमरावतीत नसल्यामुळं अमरावती जिल्हा विकासपासून दूर राहिला.
अमरावती : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री या निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठणाचा आग्रह केला होता. त्यामुळं राणा दाम्पत्याला तुरुंगात जावे लागले. तुरुंगवारी संपल्यानंतर राणा दाम्पत्य हे दिल्लीमध्ये होते. मात्र आता तब्बल 36 दिवसानंतर आज राणा दाम्पत्य अमरावतीमध्ये येणार आहे. राणा दाम्पत्याच्या स्वागताची जय्यत तयारी युवा स्वभिमान पक्षाने (Yuva Swabhiman Paksh) केली आहे. आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांचे स्वागत युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने ठिक-ठिकाणी केले जाणार आहे. त्यानंतर रात्री अमरावतीच्या दसरा मैदान परिसरातील (Dussehra Maidan Complex) हनुमान मंदिरात राणा दाम्पत्याकडून हनुमान चालिसा व महाआरती केली जाणार आहे.
दीड क्विंटल फुलांचा हार
अमरावतीत राणा दाम्पत्याच्या गंगा सावित्री निवस्थानासमोर स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे. राणा कुटुंबीय खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांचं स्वागत करणार आहेत. राणा दाम्पत्याचा दुग्धभिषेक देखील केला जाणार आहे. सुंदर कांडदेखील होईल. सात पंडित पूजन करतील. दीड क्विंटल फुलांचा हार टाकला जाईल. घरासमोर व्यासपीठाची उभारणी सुरू झाली आहे. राणा दाम्पत्य कार्यकर्त्यांना संबोधित करण्याची शक्यता आहे. विरोधकांचाही समाचार घेण्याची शक्यता आहे.
शिवसेनेची पोस्टरबाजी काय
छत्तीस दिवस पाखडले काहीच नाही सापडले. शेवटी आले येथेचं, अशाप्रकारचे पोस्टर लावण्यात आले आहेत. राणा दाम्पत्याविरोधात हे पोस्टर अमरावतीत लावण्यात आले आहेत. शिवसेनेचे पराग गुढगे यांनी हे पोस्टर लावलेले आहेत. छत्तीस दिवस राणा दाम्पत्य अमरावतीत नसल्यामुळं अमरावती जिल्हा विकासपासून दूर राहिला. मतदारांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी जिल्ह्यातून गायब होते. अमरावती जिल्ह्यातील नागरिक हे महागाई, बेजोजगारीने त्रस्त झाले आहेत. आता महागाई, बेरोजगारीचा प्रश्न त्यांनी सोडवावा, या आशयाचे पोस्टर शिवसेनेने राणा दाम्पत्याविरोधात लावले आहे.
महागाई विरोधात राणा दाम्पत्य का बोलत नाही
हनुमान चालिसा प्रकरणानंतर राणा दाम्पत्य हे आज 36 दिवसांनंतर अमरावती जिल्हात येत आहे. त्यासाठी राणा दाम्पत्याचे स्वागत करण्यासाठी युवा स्वाभिमान समर्थक सज्ज झाले आहेत. मात्र 36 दिवसांत अमरावती जिल्ह्याकडे दुर्लक्ष झालंय. विकास खुंटला असा आरोप अमरावतीच्या शिवसेना नेत्यांनी केला. तर बेरोजगार, महागाई विरोधात राणा दाम्पत्य का बोलत नाही असा सवाल राणा दाम्पत्याला शिवसेनेने विचारला. अमरावतीत राणांच्या विरोधात शिवसेनेने बॅनरबाजी करत त्यांचा विरोध दर्शविला. अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख राजेश वानखडे यांनी दिली.