स्वप्निल उमप
अमरावती : वर्षभर महिला पोलीस अधिकारी (Women Police Officer) आणि महिला पोलीस कर्मचारी या आपल्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळून पोलीस खात्यात कर्तव्य बजावत असतात. परंतु जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने या महिला पोलीस अधिकारी आणि महिला पोलीस कर्मचारी यांच्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. अमरावतीमध्येही जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने डॉ. आरती सिंह (Dr. Aarti Singh), पोलीस आयुक्त अमरावती शहर तसेच रोटरी ग्रुप ऑफ अमरावती अंबानगरी आणि शिवाजी कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन अमरावती यांच्या सहभागाने महिला पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या झुंबा नृत्याचे ( Jhumba dance) आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिला पोलिसांनी मनसोक्तपणे या नृत्याचा मनमुराद आनंद लुटला. यावेळी सर्व महिला पोलिसांनी फेटे परिधान करून या कार्यक्रमात सहभाग नोंदवला.
महिला दिनानिमित्त अमरावती पोलिसांनी असे झुंबा नृत्य केले. pic.twitter.com/rBRbsklJRg
— Govind Hatwar (@GovindHatwar) March 8, 2022
जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने महिला सशक्तीकरण जनजागृती करण्याकरिता बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. अमरावती शहराच्या पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह, तसेच रोटरी ग्रुप ऑफ अमरावती अंबानगरी आणि शिवाजी कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन अमरावती यांच्या सहभागाने ही रॅली काढण्यात आली. सकाळी नऊ वाजताच्या सुमारास या रॅलीला पोलीस आयुक्तालयाच्या मैदानातून आयुक्त डॉ. आरती सिंग यांनी हिरवी झेंडी दाखवली. त्यानंतर ही रॅली बियाणी चौक, जिल्हाधिकारी कार्यालय, पंचवटी चौक, इर्विन चौकासह इतर चौकातून या रॅलीने मार्गक्रमण केले. महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्या रॅलीने अमरावती करांचे लक्ष वेधून घेतले होते.