Badnera Constituency : अमरावतीच्या वेशीवर रवी राणा बांधणार चौथ्यांदा तोरण? काय आहे महाविकास आघाडीसह भाजपच्या कार्यकर्त्यांचे धोरण, बडनेरा विधानसभेत झेंडा कुणाचा?

Ravi Rana Badnera Constituency : अमरावतीच्या वेशीवर या लोकसभेपासून मोठी धुमश्चक्री सुरू आहे. रवी राणा आणि नवनीत राणा यांच्याविरोधात जणू सर्वच पक्षाचे नेते एकवटले आहेत. आता तर उपरा आणि स्थानिक असा वाद उफाळला आहे. विशेष म्हणजे तीनदा विजयाची हॅटट्रिक साधणारे रवी राणा यांना ही विधानसभा सोपी राहिलेली नाही.

Badnera Constituency : अमरावतीच्या वेशीवर रवी राणा बांधणार चौथ्यांदा तोरण? काय आहे महाविकास आघाडीसह भाजपच्या कार्यकर्त्यांचे धोरण, बडनेरा विधानसभेत झेंडा कुणाचा?
बडनेरामध्ये यंदा दिसेल चुरस?
Follow us
| Updated on: Oct 25, 2024 | 3:02 PM

अमरावतीच्या वेशीवर लोकसभेपासून वादाचे तोरण आहे. रवी राणा विरोधात आम्ही सारे असे जणू काही समीकरण आखण्यात आले आहे. नवनीत राणा यांना भाजपच्या कोट्यातली तिकीट सुटल्यावर तर भाजपमध्येच नाराजांची संख्या वाढली. नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आले होते. यंत्रणा राबवण्यात आली होती. पण काँग्रेसने तिथं करिष्मा केला. बळवंत वानखेडे निवडून आले. अर्थात या विजयात सत्ताधाऱ्यांचा पण वाटा असल्याची चर्चा रंगली. आता विधानसभेच्या रणधुमाळीत पण असेच चित्र आहे. बडनेरा विधानसभा मतदारसंघात रवी राणा विरोधात आम्ही सारे असा काहीसा सामना असल्याचे चित्र आहे. भाजपचे अनेक जण नाराज आहेत. तर इकडे उद्धव सेनेने माजी उमेदवार प्रीती बंड यांना उमेदवारी नाकारल्याने बडनेरामध्ये रवी राणांचा विजयाचा मार्ग सुकर झाल्याचा दावा करण्यात येत आहे. एका महिन्यात येथील चित्र स्पष्ट होईल.

2009 मध्ये रवी राणा यांचा दे धक्का

बडनेरा मतदारसंघ 1962 साली अस्तित्वात आला. अमरावतीच्या वेशीवरील शहर म्हणून बडनेरा ओळखं जातं. बडनेरा शहरी आणि ग्रामीण भाग मिळून तयार झालेला मतदारसंघ आहे. काँग्रेसचे पुरुषोत्तम देशमुख यांनी पहिल्यांदा आमदार होण्याचा मान मिळवला. त्यानंतर रिपब्लिकन पार्टीचे के. बी. श्रृंगारे हे निवडून आले. या मतदारसंघावर काँग्रेसचे प्राबल्य दिसून आलेले आहे. काँग्रेसचे उमेदवार सहा वेळा या मतदारसंघातून निवडून आले आहेत.

हे सुद्धा वाचा

2009 मध्ये रवी राणा यांनी मोठी कमाल केली. अगदी कमी वयात त्यांनी विजयीचे समीकरण जुळवून आणले. अपक्ष म्हणून त्यांनी मोठा विजय मिळवला. तेव्हापासून राजकीय समीकरण जुळवत त्यांनी विजय रथ खंडीत होऊ दिला नाही. 2014 मध्ये त्यांनी अटीतटीच्या लढतीत काँग्रेस उमेदवाराचा पराभव केला होता. बडनेरा आणि रवी राणा असे पक्कं समीकरण त्यांनी जुळवून आणले. 2019 मध्ये त्यांना राष्ट्रवादी, काँग्रेसने पाठिंबा दिला. त्यानंतर त्यांनी भाजपला पाठिंबा दिला. युवा स्वाभिमान पार्टीकडून त्यांनी उमेदवारी जाहीर केली. ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक मानल्या जातात.  गेल्या तीन निवडणुकीत त्यांच्यासमोर काँग्रेस-राष्ट्रवादी असं परंपरागत विरोधक होते. पण आता मित्रपक्ष भाजपमधूनच विरोध होत आहे. त्यातच शिंदे सेनेतील इच्छुक सुद्धा नाराज आहेत.

दर्यापूरचे गणित ठरू शकते घातक

नवनीत राणा या अमरावती लोकसभा निवडणुकीत उभ्या होत्या. त्यांच्याविरोधात काँग्रेसने बळवंत वानखेडे यांना उभे केले होते. खासदारकीचा हा सामना अटीतटीचा ठरला. त्यात काँग्रेसने बाजी मारली. भाजपमधील नाराजीचा पण नवनीत राणा यांना फटका बसल्याचे बोलले जाते. त्यानंतर आता दर्यापूर मतदारसंघातून नवनीत राणा या विधानसभेसाठी भाजपच्या तिकीटावर इच्छुक असल्याचे सांगितले जाते. दर्यापूर अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. जर नवनीत राणा यांना तिकीट दिले तर बडनेरामध्ये पण त्याचे पडसाद उमटू शकतात, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

रवी राणांविरोधात आम्ही सारे

सध्या बडनेरा मतदारसंघात रवी राणा यांच्याविरोधात आम्ही सारे असं काहीसं चित्र आहे. शिंदे सेना, भाजप यातील नाराज आणि महाविकास आघाडी यांची मोट बांधल्या गेली तर यंदा बडनेरामध्ये मोठी चुरस दिसेल. अर्थात रवी राणा यांचे संघटन पक्कं आहे. त्यांचं या मतदारसंघातील जनतेशी जनसंपर्क दांडगा आहे. त्याचा त्यांना फायदा होऊ शकतो. त्यामुळे यंदा अमरावतीच्या वेशीवर कोण तोरण बांधेल या प्रश्नाचं उत्तर एका महिन्यानंतर मिळेल.

भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.