AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nana Patole | मोहन भागवत हे मोदी सरकारचे रिमोट कंट्रोल, नाना पटोले यांचा अमरावतीत घणाघात

नाना पटोले म्हणाले, संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे केंद्रातील भाजप सरकार जुने मुरदे उखरण्याचे काम करत आहेत. मोदी सरकारचे रिमोट कंट्रोल मोहन भागवत आहेत. भाजप आणि संघ वेगळा विषय नाही हे सगळ्यांनाच माहीत आहे.

Nana Patole | मोहन भागवत हे मोदी सरकारचे रिमोट कंट्रोल, नाना पटोले यांचा अमरावतीत घणाघात
मोहन भागवत हे मोदी सरकारचे रिमोट कंट्रोल, नाना पटोले यांचा घणाघात Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Jun 03, 2022 | 12:27 PM

अमरावती : महाविकास आघाडीमधील मंत्री विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांना भेटत असतील तर चांगली बाब आहे. कारण महाराष्ट्राची परंपरा कायम राहिली पाहिजे. या पद्धतीचं काम होणे गरजेचे आहे. राज्यसभेची निवडणूक बिनविरोध व्हावी अशी सगळ्यांची अपेक्षा आहे. यामध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) जातील. प्रत्येक पक्षाला आपली आपली रणनीती करण्याचा अधिकार आहे. महाराष्ट्राची परंपरा आहे. त्यामुळे राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुका बिनविरोध व्हाव्या अशी अपेक्षा आहे, असं मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केलंय. अमरावतीत ते आज बोलत होते. मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्याबद्दल नाना पटोले म्हणाले, राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) भोंग्याच्या मुद्द्यामुळे धार्मिक विरोध वाढायचा होता तो वाढला. यामध्ये हिंदू मुस्लिमांच्या मंदिर मशिदीवरील भोंग्याचा आवाज कमी करण्यात आला. गावोगावी काकड आरत्या बंद झाल्या. शिर्डीमध्ये काकड आरतीतून वातावरण निर्माण व्हायचं ते मला जाणवलं नाही. न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे भोंग्याची कारवाई करावी अशी अपेक्षा आहे. धार्मिक द्वेष निर्माण झाला. यामध्ये जनतेचे मूळ प्रश्न बाजूला पडतात, असंही पटोले म्हणाले.

महागडे बियाणे शेतकऱ्यांना देऊ नये

सचिन वाझे माफीचा साक्षीदार होणार का, यावर नाना पटोले म्हणाले, सचिन वाझे बद्दल सामनामध्ये आज येत असेल पण आम्ही यापूर्वीच हा प्रश्न विधानसभेत मांडला. त्या ठिकाणी मी एकटाच विरोध करत होतो, ही स्क्रिप्ट आहे. त्यादिवशी मी सांगितलं हे राज्याला बदनाम करण्याचं काम आहे. दरम्यान, महाबीजबद्दल पटोले यांनी सांगितलं की, बच्चू कडू यांनी सांगितल्याप्रमाणे असे असेल तर त्या व्यवस्थेवर कारवाई झाली पाहिजे. चांगल्या दर्जाचे सोयाबीन बियाणे आणि कमी किमतीमध्ये शेतकऱ्यांना मिळेल अशा प्रकारचे धोरण राज्य सरकारने करावे. महागडे बियाणे शेतकऱ्यांना देऊ नये.

भाजप आणि संघ वेगळा विषय नाही

नाना पटोले म्हणाले, संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे केंद्रातील भाजप सरकार जुने मुरदे उखरण्याचे काम करत आहेत. मोदी सरकारचे रिमोट कंट्रोल मोहन भागवत आहेत. भाजप आणि संघ वेगळा विषय नाही हे सगळ्यांनाच माहीत आहे. अमरावती लोकसभा निवडणुकीबद्दल नाना पटोले म्हणाले, अमरावती लोकसभा मतदारसंघात पुढचा खासदार काँग्रेसचाच निवडून येणाराय. काँग्रेस जवळ अमरावती लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी खूप सारे उमेदवार आहेत. कार्यकर्त्यांनी आपल्या भावना मांडणे हे चुकीचं नाही. अनेकांना वाटत होतं अमरावतीमध्ये काँग्रेसजवळ उमेदवार नाही.

हे सुद्धा वाचा

पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!.
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ.
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती.
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?.
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार.
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर.
अटारी बॉर्डरवर तणावपूर्ण शांतता; अमृतसरमध्ये रेड अलर्ट कायम
अटारी बॉर्डरवर तणावपूर्ण शांतता; अमृतसरमध्ये रेड अलर्ट कायम.
काश्मीरवर तोडगा निघणार? डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं मोठं विधान
काश्मीरवर तोडगा निघणार? डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं मोठं विधान.
पाकच्या पंतप्रधानांचं ऐकण्यास मुल्ला मुनिरचा नकार
पाकच्या पंतप्रधानांचं ऐकण्यास मुल्ला मुनिरचा नकार.
अमेरिकाके पापाने वॉर रुकवा दिया क्या?, युद्धबंदीवर राऊतांची विखारी टीक
अमेरिकाके पापाने वॉर रुकवा दिया क्या?, युद्धबंदीवर राऊतांची विखारी टीक.