Navneet Rana : 1 राणा दाम्पत्य, 4 पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल, विनापरवानगी शक्तिप्रदर्शन भोवलं, कारवाई काय होणार?

रात्री उशीरापर्यंत दुग्धाभिषेक आणि इतर कार्यक्रम सुरूच होते. त्यानंतर आता आज पोलीस (Amravati Police) आक्रमक मोडवर आले आहेत. कारण पोलिसांनी एक दोन ठिकाणाी नाही तर तब्बल चार ठिकाणाी राणा दाम्पत्यावर गुन्हे दाखल केले आहेत.

Navneet Rana : 1 राणा दाम्पत्य, 4 पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल, विनापरवानगी शक्तिप्रदर्शन भोवलं, कारवाई काय होणार?
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 29, 2022 | 7:59 PM

अमरावती : राज्यात गेल्या अनेक दिवसात हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) वाद, त्यावरून नवनीत राणा (Navneet Rana) आणि रवी राणा यांची झालेली अटक, पोलीस स्टेशमध्ये मिळालेल्या वागणुकीच्या दिल्लीपर्यंत तक्रारी, या सर्व प्रकरानंतर बऱ्याच दिवसांपासून दिल्लीत असणाऱ्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि रवी राणा हे काल बऱ्याच दिवासांनी अमरावतीत परतले. राणा दाम्पत्य अमरावतीत परततचा त्यांनी नागपुरात हनुमान चालीसा पठण करत सरकारवर पुन्हा जोरदार हल्लाबोल चढवाला. तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांनी अमरावतीत त्यांचे जंगी स्वागत केले. भव्य रॅलीही काढण्यात आली. तसेच रात्री उशीरापर्यंत दुग्धाभिषेक आणि इतर कार्यक्रम सुरूच होते. त्यानंतर आता आज पोलीस (Amravati Police) आक्रमक मोडवर आले आहेत. कारण पोलिसांनी एक दोन ठिकाणाी नाही तर तब्बल चार ठिकाणाी राणा दाम्पत्यावर गुन्हे दाखल केले आहेत.

राणा यांच्यावर कुठे गुन्हे दाखल?

  1. पोलीस स्टेशन सिटी कोतवाली– अमरावतीत राणा दाम्पत्याच्या स्वागत रॅली प्रकरणी रवी राणांच्या तीन कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. यात विना परवानगी क्रेन लावून हार घातल्याने, स्वागत रॅलीमुळे मालवीय चौक ते राजकमल चौक या मार्गावर वाहतुकीला अडथडा निर्माण झाल्याने हे गुन्हे दाखल केले आहेत. कलम 188,283, 34 अंतर्गत हे गुन्हे दाखल झाले आहेत. यात बाळासाहेब इंगोले, मनोजकुमार नवल किशोर आणि सुशील लोखंडेंवर गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
  2. गाडगेनगर पोलीस स्टेशन– या पोलीस स्टेशनमध्ये रवी राणा व नवनीत राणा यांच्यासह जवळपास दीडशे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. परवानगी न घेता स्वागत रॅली काढणे, मोठ्या प्रमाणावर गर्दी जमवणे व वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्याने पोलिसांनी गुन्हे दाखल केले. गाडगेनगर पोलीसांनी कलम 135,341,143,291 135 अंतर्गत ही कारवाई केली आहे.
  3. राजापेठ पोलीस स्टेशन– खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यासह 14 कार्यकर्त्यांवर राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. अमरावती येथील शंकर नगर येथील राणा यांच्या घरासमोर रोडवर स्टेज टाकून रस्त्यावर अडथळा निर्माण केले आणि मध्यरात्रीच्या 12 वाजेपर्यंत लाऊडस्पिकर लावून कार्यक्रम घेतला त्यामुळे नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केल्याचे सांगण्यात आले आहेत.  राजापेठ पोलीस स्टेशन मधील पोलीस निरीक्षक स्वाती पवार यांच्या तक्रारीवरून 341, 188, 134, 135 कलम 15 पर्यावरण संवर्धन अधिनियम 1986 आयपीसी अंतर्गत गुन्हे दाखल झाले आहेत. तक्रारीवरून युवा स्वाभिमानचे खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा, अजय मोरया, जयश्री मोरया, जितू दुधाने, बाळू इंगोले प्रवीण गुल्हाने, साक्षी उमप अधिक 8 ते 10 कार्यकर्ते यांच्यावर गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
  4. नांदगाव पेठ पोलीस स्टेशन-या पोलीस ठाण्यात 7 ते 8 आयोजकावर गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यात जेसीबी व साउंड लावणे अशा नियमांचा समावेश आहे.
  5. हे सुद्धा वाचा
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.