‘मुख्यमंत्री महाराष्ट्राला लागलेला शनी’, उद्वव ठाकरेंचं मुख्यमंत्रीपद जावं म्हणून नवनीत राणांची हनुमानाकडे प्रार्थना

Navneet Rana on Uddhav Thackeray : आज 36 दिवसांनतर राणा दाम्पत्य अमरावतीत दाखल झालं तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. तेव्हा या दोघांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी खासदार नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंवर कठोर शब्दात टीका केली.

'मुख्यमंत्री महाराष्ट्राला लागलेला शनी', उद्वव ठाकरेंचं मुख्यमंत्रीपद जावं म्हणून नवनीत राणांची हनुमानाकडे प्रार्थना
Follow us
| Updated on: May 28, 2022 | 2:16 PM

अमरावती : हनुमान… सध्या राज्याच्या राजकारणातील सर्वाधिक चर्चेतला विषय. मागच्या दीड महिन्यापासून नवनीत राणा (Navneet Rana) आणि रवी राणा (Ravi Rana) यांनी हा मुद्दा चांगलाच लावून धरला आहे. आज 36 दिवसांनतर राणा दाम्पत्य अमरावतीत दाखल झालं तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. तेव्हा या दोघांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) कठोर शब्दात टीका केली.”मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे महाराष्ट्राला लागलेला शनी आहे, हे संकट दूर व्हावं म्हणून आम्ही हनुमानाचरणी प्रार्थना करतोय”, असं नवनीत राणा म्हणाल्या आहेत.

मुख्यमंत्र्यांवर टीका

खासदार नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंवर कठोर शब्दात टीका केली.” मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्राला लागलेला शनी आहे, हे संकट दूर व्हावं म्हणून आम्ही हनुमानाचरणी प्रार्थना करतोय”, असं नवनीत राणा म्हणाल्या आहेत.

“महाराष्ट्रात हनुमान चालिसाला विरोध का?”

अमरावतीत जाताच नवनीत राणा यांनी हनुमान चालिसा आणि रामाच्या मुद्द्यावर भाष्य केलं. देशात हनुमानाला मान आहे. “आम्ही दिल्लीत हनुमान चालिसा म्हटली तर लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. पण महाराष्ट्रात मात्र वेगळी परिस्थिती आहे. महाराष्ट्रात हनुमानाचा एवढा तिरस्कार का केला जातोय?, असा सवाल नवनीत राणा यांनी उपस्थित केला.

रवी राणा म्हणाले

आमदार रवी राणा यांनी सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केलाय. “हनुमान चालिसा वाचणं ही आमच्या हिंदूंची संस्कृती आहे. इतका पोलीस बंदोबस्त. इतका दबाव. मला वाटतं, महाराष्ट्रामध्ये हनुमानाचं नाव घेईल त्याला जेलमध्ये टाकण्याचा एकसुत्री कार्यक्रम सध्या सरकारच्या माध्यमातून सुरू आहे. येत्या काळात रामभक्त, हनुमान भक्त राज्य सरकारला धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही. महाराष्ट्राची संस्कृती बिघडवण्याचं काम राज्य सरकारनं केलं आहे. पण आम्ही अश्या दबावाला घाबरत नाही, आम्ही आजही अमरावतीतल्या रामनगरच्या हनुमान मंदिरात प्रार्थना करणार आहोत”, असं रवी राणा म्हणालेत.

अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.