युक्रेनमध्ये अडकली होती अमरावतीची नेहा, मायदेशी परतल्यावर सांगितला थरारक अनुभव!
कसाबसा जीव मुठीत घेऊन युक्रेनच्या बाहेर पडलो. कधी-कधी पायी प्रवासही करावा लागला. शेजारच्या देशात पोहचल्यावर जीवात जीव आला. त्यानंतर भारतीय दूतावासाने भारतात आणण्याची व्यवस्था केली.
अमरावती : युक्रेन आणि रशियामध्ये (Ukraine and Russia) सध्या जोरदार युद्ध सुरू आहे. चोवीस फेब्रुवारी रोजी सकाळी पाच वाजता रशियाने युक्रेनच्या खारघरमध्ये मिसाईलने हल्ला (missile attack in Kharghar) केला होता. खारघरमध्ये अनेक भारतीय वैद्यकीय शिक्षणासाठी या ठिकाणी राहत होते. यातील एका भारतीय नेहा लांडगे या तरुणीने युद्धातील हल्ल्याचा थरारक अनुभव ( thrilling experience of war attack ) अनुभवला आहे. नेहा लांडगे ही अमरावती जिल्ह्यातील वरुड येथे राहणारी विद्यार्थी आहे. ज्यावेळी रशियाने खारघर येथे हल्ला चढवला, त्यावेळी नेहाने तिच्याकडे मिसाईल येताना बघीतला. काही कारणास्तव हा न फुटल्याने आम्ही वाचलो. असा थरारक अनुभव नेहाने अमरावतीत परत आल्यानंतर सांगितला.
भारतीय राहत होते समुहाने
ज्या वेळी हल्ला झाला, तेव्हापासून सगळे भारतीय विद्यार्थी समूह करून राहत असे. या हल्ल्यातून सुटका करण्यासाठी भारतीय विद्यार्थी एक मार्च रोजी रेल्वेने पोलंडकडे निघाले. काही काळ पायी प्रवास करून विद्यार्थी पोलंड येथे पोहोचल्यानंतर भारतीय दूतावासाने त्यांना सुखरूप मायदेशी परत आणले आहे. नेहा घरी पोहचल्यानंतर परिसरातील नागरिकांनी नेहाकडे गर्दी केली आहे. नेहा सुखरूप घरी परतल्याने तिचे वडील भीमराव यांनी सुटकेचा निःश्वास टाकला.
नेहाने सांगितला तो थरारक अनुभव
नेहा म्हणाली, जिथं राहत होतो तिथंच मिसाईल पडली. त्यामुळं आमची पंढरी घाबरली होती. पण, ती मिसाईल फुटली नाही. त्यामुळं आम्ही थोडक्यात बचावलो. त्या प्रसंगापासून आम्ही प्रचंड घाबरलो होतो. कसाबसा जीव मुठीत घेऊन युक्रेनच्या बाहेर पडलो. कधी-कधी पायी प्रवासही करावा लागला. शेजारच्या देशात पोहचल्यावर जीवात जीव आला. त्यानंतर भारतीय दूतावासाने भारतात आणण्याची व्यवस्था केली.