भय इथले संपत नाही, अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातला अतिशय धक्कादायक प्रकार, विजय वडेट्टीवार संतापले

अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातला अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इथे अनेक महिला प्रसुतीसाठी दाखल होतात. अनेक नवजात बालकांचा या रुग्णालयात जन्म होतो. पण या गोष्टीचं गांभीर्य रुग्णालय प्रशासनाला नाही, असं स्पष्टपणे उघड झालंय.

भय इथले संपत नाही, अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातला अतिशय धक्कादायक प्रकार, विजय वडेट्टीवार संतापले
Follow us
| Updated on: Aug 26, 2023 | 5:10 PM

अमरावती | 26 ऑगस्ट 2023 : अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील धक्कादायक बातमी समोर आली आहे. या रुग्णालयात गेल्या दोन ते तीन तासांपासून वीज पुरवठा खंडीत झालाय. त्यामुळे महिला रुग्ण आणि नवजात बालकं यांचा गरमीमुळे अक्षरश: गुदमरुन जीव जाण्याची वेळ आलीय. महिला रुग्णालय अतिशय महत्त्वाचं ठिकाण असतं. या रुग्णालयात अनेक नवजात बालकांचा जन्म होतो. त्यामुळे महिला रुग्णालयांची विशेष काळजी घेणे जास्त जरुरीचं असतं. पण असं असताना अमरावती जिल्हा रुग्णालयातील हा धक्कादायक आणि अतिशय असंवेदनशील असा प्रकार समोर आलाय.

वीज पुरवठा खंडीत झाल्यानंतर पर्यायी व्यवस्था का उपलब्ध नव्हती? जनरेटर किंवा इनव्हर्टर व्यवस्था का उपलब्ध नव्हती? असेही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. संबंधित प्रकारामुळे रुग्णालय प्रशसानाचा ढिसाळपणा स्पष्टपणे समोर येत आहे. रुग्णालय प्रशासनाला महिला रुग्ण आणि लहान बालकांची खरंच चिंता आहे का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. संबंधित प्रकार समोर आल्यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर यांनी रुग्णालयाला भेट दिलीय. यावेळी त्यांनी प्रचंड संताप व्यक्त केलाय.

रुग्णही संतापले, प्रचंड गरमीमुळे नवजात बालकही त्रस्त

दरम्यान, अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात अचानक वीज पुरवठा खंडित झाल्याने रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. या रुग्णालयात महिला प्रसूतीसाठी येत असतात. रुग्णालयातील वीज पुरवठा खंडीत झाल्याने आता रुग्णही संतप्त झाले आहेत. वीज पुरवठा खंडीत झाल्याने प्रसूती झालेल्या महिलांना आणि नवजात बालकांना गरमीचा प्रचंड त्रास होत आहे.

खिडक्या उघडल्या तर डासांचं साम्राज्य

विशेष म्हणजे वीज गेल्यामुळे रुग्णालयात प्रचंड गरम होत आहे. महिला रुग्णांनी हवा यावी यासाठी रुग्णालयाच्या खिडक्या उघडल्या तर प्रचंड डास आतमध्ये येत आहेत. त्यामुळे देखील महिला रुग्ण त्रस्त झाले आहेत. विजय वडेट्टीवार यांनी देखील या गोष्टीवर चिंता व्यक्त केलीय. “राज्यात आज डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. मलेरिया, टायफॉईड सारखे आजार सर्वत्र आहेत. अशा स्थितीत वीज नसणं, मच्छरांमुळे नवीन जन्मलेल्या बालकांचा जीव धोक्यात येणं ही किती मोठी गैरसोय आहे, हा गुन्हा आहे. या सर्वांविरोधात मी कारवाई करायला लावेल”, अशी प्रतिक्रिया वडेट्टीवार यांनी दिलीय.

“डिलेव्हरी वॉर्डमध्येच लाईट नाही. इथे सिझरचे पेशन्ट आहेत. ऑपरेशन थिएटरमध्येच लाईट नाही. उद्या जास्त ब्लिडिंग झालं, जीव गेला, तर कोण जबाबदार राहणार?”, असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला.

अखेर चार तासांनी वीज पुरवठा पूर्ववत

वीज पुरवठा खंडीत झाल्यामुळे मोठा गोंधळ उडाल्यानंतर अखेर चार तासांनी रुग्णालयात वीज पुरवठा पूर्ववत झाल्याची माहिती समोर आली आहे. एका शासकीय स्त्री रुग्णालयाची तब्बल चार तास वीज पुरवठा खंडीत होत असेल तर हा प्रकार चिंताजनक आहे, असं मत स्थानिकांकडून व्यक्त केलं जात आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.