‘उद्धव ठाकरे यांनी खरंतर चुल्लूभर पाणीमध्ये डुबून मरायला पाहिजे’, रवी राणा यांची जीभ घसरली

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना आमदार रवी राणा यांची जीभ घसरली.

'उद्धव ठाकरे यांनी खरंतर चुल्लूभर पाणीमध्ये डुबून मरायला पाहिजे', रवी राणा यांची जीभ घसरली
Follow us
| Updated on: Nov 17, 2022 | 9:48 PM

अमरावती : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना आमदार रवी राणा यांची जीभ घसरली. “उद्धव ठाकरेंनी चुल्लूभर पाण्यात डुबून मरायला पाहिजे”, असा घणाघात रवी राणा यांनी केलाय. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशीदेखील मागणी त्यांनी केलीय. रवी राणा यांच्या या वादग्रस्त विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा नवा वाद उफाळण्याची शक्यता आहे.

“स्वातंत्र्यवीर सावरकर यांना इंग्रजांनी काळ्या पाण्याची शिक्षा दिली. देशावर प्रेम करणारे, देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात स्वत:ला समर्पित करणारे वीर सावरकर यांच्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यांच्या वक्तव्याचं शिवसेना पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी समर्थन केलं”, असा दावा रवी राणा यांनी केला.

“उद्धव ठाकरे देशविरोधी वक्तव्य करणारे राहुल गांधी यांना समर्थन करतात. उद्धव ठाकरे यांनी खरंतर चुल्लूभर पाणीमध्ये डुबून मरायला पाहिजे”, अशी टीका रवी राणा यांनी केली.

“राहुल गांधी अशाप्रकारचे वक्तव्य करतात आणि उद्धव ठाकरे त्यांचं समर्थन करतात. त्यामुळे दोघांवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. ही माझी मागणी आहे”, असंदेखील ते म्हणाले.

“राहुल गांधींनी संपूर्ण देशाची माफी मागितली पाहिजे. उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे. अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करु”, असा इशारा रवी राणा यांनी दिला.

अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.