…चरणस्पर्श हीच माझी लक्ष्मीपूजा, खासदार नवनीत राणा यांनी सांगितलं कारण
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री गरिबांची जाण ठेवणारे आहेत.
अमरावती : अमरावतीत राणा दाम्पत्यानं दिवाळी मिलनचा कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमात खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी चांगलीच फटकेबाजी केली. खासदार नवनीत राणा म्हणाल्या, दर्यापूरची मुलगी. 75 टक्के आई दिव्यांग आहे. तरीही ती मुलगी नीटची परीक्षा देत आहे. दिव्यांगांमध्ये सिक्स सेन्स खूप चांगले असतात. हे चालू शकत नाही. पाहू शकत नाही. पण, कुठं बसलो पाहिजे, कुठं गेलं पाहिजे. त्यांना बरोबर समजते.
मेहनत काय असते हे शिकायचं असेल, तर या लोकांपासून शिकायला पाहिजे. एक आंधळा मुलगा ट्रेनमध्ये खेळणे विकून अडीचशे रुपये कमवू शकतो. मग, मी माझ्या जीवनात काहीतरी नक्कीच कमवू शकतो. आपण आपल्या बाजूला जी परिस्थिती दिली. तिच्यासोबत कसं जगायचं, हे या लोकांकडून आपण शिकू शकतो, असंही नवनीत राणा म्हणाल्या.
दिव्यांगांना एक हजार रुपये मानधन मिळते. पण, त्यांची मागणी तीन हजार रुपये महिन्याचे मिळावेत, अशी आहे. या सरकारकडून भेटलं पाहिजे. यासाठी संसदेत ही मागणी मी केली. दिव्यांगांना औषधी मिळते. दुसऱ्यांसमोर हात पसरावे लागतात. तोच विषय संसदेत उचलला. तुमची बहीण म्हणून, मुलगी म्हणून मी प्रयत्न केले. त्यासाठी पाठपुरावा करणार आहे, असे आश्वासन नवनीत राणा यांनी दिले.
रवी राणा आपण आमदार आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री गरिबांची जाण ठेवणारे आहेत. स्पेशल मिटिंग करून राज्य, केंद्र सरकार यांनी मिळून आणखी काहीतरी आधार मिळाला पाहिजे. कुठूनही आणू, राज्य किंवा केंद्राकडून प्रयत्न करू. आम्ही पाठपुरावा नक्की करू, असं आश्वासनही नवनीत राणा यांनी दिव्यांगांना यावेळी दिले.
नवनीत राणा म्हणाल्या, अमरावती जिल्ह्यात राहणाऱ्यांचे पत्र आले. त्यांची मागणी होती की, एसटी महामंडळात तिकीट सवलत मिळावी. दिव्यांगांना अमरावती मनपात तिकीट मोफत देण्याची सवलत नागपूरसारखी मिळेल. यासाठीही प्रयत्न करणार असल्याचं नवनीत राणा यांनी सांगितलं.
ही दिवाळी मीलन.युवा स्वाभिमान पक्षाकडून किराणा वाटप सुरू आहे. जनतेचे चरणस्पर्श हीच माझी लक्ष्मीपूजा, असल्याचं प्रतिपादन यावेळी नवनीत राणा यांनी केलं. रवी राणांचा किराणा एवढा फेमस झाला की, राज्यानं किराणा वाटप सुरू केला, असंही त्या म्हणाल्या.
शिवाय, आई दिवाली लो किराणा, अमरावती जिले में सिर्फ राणा ही राणा अशा घोषणा देत. त्यांनी चांगलीच फटकेबाजी केली.