St Worker Protest : हे प्रकरण घडवून आणून सहानुभूती मिळवायची होती? पवारांना विचारा, अनिल बोडेंची CBI चौकशीची मागणी
हे आंदोलन सहानुभूती मिळवण्यासाठी करण्यात आलं आहे का? हे राष्ट्रवादीने रचलेले षडयंत्र आहे का? आणि कालचे आंदोलन आणि वकील गुणरत्न सादवर्ते यांना सरकारकडून बळीची बकरा बनवलं जात आहे का? याची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी अशी थेट मागणी भाजप नेते अनिल बोंडे यांनी केली आहे, त्यामुळे या प्रकरणात आता नवं ट्विस्ट येण्याची शक्यता आहे.
मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांनी (St Worker Protest) केलेल्या आंदोलनाप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली गेली आहे. तर इतर आंदोलकांना न्यायालयीन कोठडी दिली आहे. अशातच आता भाजप नेत्यांकडून जोरदार प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. भाजप नेते अनिल बोडेंनी (Anil Bonde) यांनी महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला आहे. शरद पवारांना सहानुभूती मिळवायची सवय आहे. त्यामुळे हे आंदोलन सहानुभूती मिळवण्यासाठी करण्यात आलं आहे का? हे राष्ट्रवादीने रचलेले षडयंत्र आहे का? आणि कालचे आंदोलन आणि वकील गुणरत्न सादवर्ते यांना सरकारकडून बळीची बकरा बनवलं जात आहे का? याची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी अशी थेट मागणी भाजप नेते अनिल बोंडे यांनी केली आहे, त्यामुळे या प्रकरणात आता नवं ट्विस्ट येण्याची शक्यता आहे.
भाजप नेत्यांनी व्यक्त केला संशय
शरद पवार यांच्यापासून आणि महाविकास आघाडीपासून जनाधार दुरावत होता, त्यामुळे सहानुभूती मिळवूण त्यांना पुन्हा जवळ आणण्याचा प्रयत्न आहे का? शरद पवार अशीच सहानुभूती मिळवतात. साताऱ्यातली पावसातली सभा असो किंवा आणखी काही असो पवार अनेकदा असे करतात, असा थेट आरोप भाजप नेते अनिल बोंडे यांनी केला आहे. तर इतर भाजप नेते हे संजय राऊत आणि शिवसेनेने गृहखात्यासाठी रचलेले षडयंत्र आहे का? शिवसेनेला गृहमंत्रिपद हवं आहे, त्यामुळे शिवसेनेचा हा प्लॅन असू शकतो असा संशय भाजप नेत्यांनी व्यक्त केला आहे.
राष्ट्रवादीची राज्यभर आंदोलनं
गडचिरोलीत देशाचे नेते व राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घरावर दगडफेक करणाऱ्याचा निषेधार्थ राष्ट्रवादी पक्षाने निदर्शने केली. दगड व चप्पल फेकणाऱ्याचा निषेध असो, शरद पवार आगे बढो हम तुम्हारे साथ है असे नारे देखील महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर गडचिरोलीत दिसले. गडचिरोली जिल्ह्यातील इंदिरा गांधी चौकात राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येत उपास्थित होऊन ही निदर्शने केली, असल्याची माहित समोर ईली आहेत, फक्त गडचिरोलीच नाही तर राज्यात अनेक ठिकाणी राष्ट्रवीने आंदोलन करत या घटनेविरोधात तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच गुणरत्न सादवर्ते यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे.