Umesh Kolhe Murder Case : एनजीओ चालविणारा मास्टरमाईंड, पोस्ट फारवर्ड करणारा डॉक्टर आणि हत्या करणारे पाच मजूर

युसुफ खान आणि उमेश कोल्हे यांचे कौटुंबिक संबंध असल्याची माहिती महेश कोल्हे यांनी दिली. आरोपी युसुफ खान यांच्या घरगुती कार्यक्रमात मृतक उमेश कोल्हे अनेक वेळा सहभागी झाले होते. युसुफ खान हा उमेश कोल्हे यांच्या अंत्यविधीच्या कार्यक्रमातही सहभागी होता.

Umesh Kolhe Murder Case : एनजीओ चालविणारा मास्टरमाईंड, पोस्ट फारवर्ड करणारा डॉक्टर आणि हत्या करणारे पाच मजूर
उमेश कोल्हे यांची हत्या करणारे आरोपी
Follow us
| Updated on: Jul 03, 2022 | 3:15 PM

अमरावती : अमरावतीत 21 जून रात्री दहा ते साडेदहा वाजता उमेश प्रल्हाद कोल्हे यांची चाकू मारून हत्या करण्यात आली. नुपूर शर्मा यांचे समर्थन करणाऱ्या सोशल मीडियावरील (Social media) पोस्ट कारणीभूत असल्याचं समोर आलंय. या प्रकरणात मुख्य आरोपी इरफान खान सह सात आरोपींना अटक करण्यात आली. शनिवारी इरफान खान (वय 32) ला पोलिसांनी नागपुरात अटक केली. इरफान खान (Irrfan Khan) हा एक एनजीओ चालवितो. इरफान खानने उमेश यांना मारण्याचा कट रचला. इरफाननं पाच मजुरांना पैशाचे आमिष दाखविले. हत्तेची योजना तयार केली. त्या पाचही जणांना समजावून सांगितलं. तुम्हाला हत्तेनंतर प्रत्येकी दहा हजार रुपये मिळतील. शिवाय कारने पळून जाण्यास मदत मिळेल, असे आश्वासन इरफाननं पाच जणांना दिले. सोशल मीडियावरील पोस्ट उमेश कोल्हे यांनी फारवर्ड केलेल्या पोस्ट पोहचविण्याचं काम डॉ. युसूफ खान (Yusuf Khan) करत होता. हे सातही आरोपी अमरावतीच्या पठाण चौक, चांदणी चौक या भागातील आहेत.

अशी आहेत आरोपींची नावं

मुद्दसिर अहमद उर्फ सोनू राजा शेक इब्राहिम (वय 22), शारुख पठान उर्फ बादशाहा हिदायत खान (वय 25), अब्दुल तौफीक उर्फ नानू शेख तस्लीम (वय 24), शोहेब खान उर्फ बुरिया साबिर खान (वय 22), अतिब रशीद आदिल रशिफ हे पाच मजूर आहेत. यांना पैशाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून हत्या करण्यात आली. डॉ. युसुफ खान बहादुर खान बिलाल हे पोस्ट फारवर्ड करण्याचं काम करत होते. यांनी या प्रकरणाला खतपाणी देण्याच कामं केलं. इरफान खाननं उमेश कोल्हे यांची हत्या करण्याचं कट कारस्थान रचलं.

मुख्य आरोपी कोण आहे?

इरफान खान हा प्रकरणातला मुख्य आरोपी आहे. तो रहबर नावाची एक एनजीओ चालवितो. त्यानेच हत्येचा कट रचला. मजुरांना पैशाचं आमिष देऊन त्यांच्याकडून हत्या करून घेतली. त्याच्याकडं फंड कुठून येणार होता. हे राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या चौकशीनंतर कळेल. या प्रकरणात आणखी काही कनेक्शन आहे का, याचा तपास एनआयए करीत आहे.

हे सुद्धा वाचा

युसुफ खानने ओतले आगीत तेल

डॉ. युसुफ खान हा व्हेटरनरी डॉक्टर आहे. उमेश कोल्हे मेडिकल स्टोर्स चालवत होते. त्यामुळं यांचे घरगुती संबंध होते. उमेश कोल्हे यांनी फारवर्ड केलेल्या पोस्ट युसुफ खान पुढं पाठवत होता. त्यामुळं द्वेषाची ठिणगी पेटली. रात्री उमेशची हत्या केल्यानंतर पाचही मजूर पळून गेले. सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिसांनी तपास केला. युसुफ खान आणि उमेश कोल्हे यांचे कौटुंबिक संबंध असल्याची माहिती महेश कोल्हे यांनी दिली. आरोपी युसुफ खान यांच्या घरगुती कार्यक्रमात मृतक उमेश कोल्हे अनेक वेळा सहभागी झाले होते. युसुफ खान हा उमेश कोल्हे यांच्या अंत्यविधीच्या कार्यक्रमातही सहभागी होता.

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.