AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amravati Crime | दारू पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसाची हत्या प्रकरण; मांजरखेड येथील दोन आरोपींना जन्मठेप

अवैध विक्री करणारी दारू पकडणे हे पोलिसांचं काम. अवैध दारुविक्री का पकडली म्हणून दारुविक्रेत्यांनी पोलिसांवरच हल्ला केला होता. यात एक पोलीस कर्मचारी ठार झाला. याप्रकरणी दोन आरोपींना जन्मपेठेची शिक्षा सुनावण्यात आली.

Amravati Crime | दारू पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसाची हत्या प्रकरण; मांजरखेड येथील दोन आरोपींना जन्मठेप
चांदुर रेल्वे पोलीस ठाण्याअंतर्गत पोलिसाचा खून करण्यात आला होता. Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Mar 23, 2022 | 10:53 AM

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील चांदूररेल्वे पोलीस स्टेशनच्या (Chandur Railway Police Station) अंतर्गत ही घटना घडली होती. एका पोलीस कर्मचाऱ्याची हत्या करणाऱ्या दोन आरोपींना अमरावती जिल्हा व सत्र न्यायालयाने (Amravati District and Sessions Court) जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच प्रत्येकी 30 हजार रुपये दंड ठोठावला. चांदुररेल्वे पोलीस स्टेशनचे कर्मचारी सतीश नाईक (Satish Naik) हे 2018 मध्ये मांजरखेड येथे गेले होते. तिथं दारू पकड मोहिमेअंतर्गत कारवाई करत होते. दारू विक्रेते उमेश राठोड व अजय राठोड यांनी पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. यात सतीश नाईक यांची निर्घृण हत्या केली होती. प्रकरण पोलिसांत पोहचले. पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. तपासानंतर दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा सिद्ध झाला. दरम्यान, या प्रकरणी आता जिल्हा व सत्र न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला.

काय आहे प्रकरण

अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे येथे दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. मे 2018 मध्ये घडली होती. या हल्लात एक पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. तर दुसरा पोलीस कर्मचारी जखमी होता. मांजरखेड येथील तांडा परिसरात पोलिसांवर हल्ल्याची घटना घडली होती. गावठी दारू पकडण्यासाठी पोलीस कर्मचारी गेले होते. दारूविक्रेत्यांनी पोलिसांवरच हल्ला केला. त्यानंतर पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी पोहचला. आरोपींना अटक करण्यात आली. दोन आरोपी दोषी आढळले. त्यांना जिल्हा व सत्र न्यायालयाने शिक्षा सुनावली. आता जन्मभर उमेश राठोड व अजय राठोड या दारुविक्रेत्या आरोपींना जेल भोगावी लागणार आहे.

Wardha Sena Rada | वर्ध्यातील शिवसेनेचा राडा मद्यपानातून, खासदार कृपाल तुमाने यांची सारवासारव

Nagpur | मानकापूर स्टेडियमवर 27 मार्चला एरोमॉडेलिंग शो, क्रीडामंत्री सुनील केदार यांची माहिती

Bhandara | वैनगंगा नदीचे प्रदूषण कसे रोखणार? उपाययोजनेचा कृती आराखडा लवकरच तयार होणार

लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण
लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण.
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली.
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना.
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग.
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!.
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ.
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती.
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?.
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार.
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर.