Amravati MP : अमरावतीचा पुढचा खासदार आणि बडनेऱ्याचा आमदार हा कमळाचा असेल, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्याचा काय अर्थ? फडणवीस म्हणतात..
भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढणार का, या प्रश्नाला त्यांनी बगल दिली. पण, राणा दाम्पत्यांना बावनकुळे यांनी भाजपची ऑफर दिली. त्यामुळं आता फडणवीस हे बावनकुळे यांना सूचक बोलल्याचं सांगत आहेत.
अमरावतीचा पुढचा खासदार आणि बडनेऱ्याचा पुढचा आमदार कमळ चिन्हाचा असेल. असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावती येथे केले. बावनकुळे फार सूचक बोललं नवनीत राणा आणि रवी राणा आमच्यासोबतच असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. त्यामुळं राणा दाम्पत्य भाजपच्या तिकिटावर लढणार का, अशा चर्चांना आता उधाण आलंय. अमरावतीत बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, अमरावतीचा पुढचा महापौर (Mayor) हा भाजपचा असेल. अमरावती जिल्हा परिषदेचा अध्यक्ष (Zilla Parishad Chairman) हा भाजपचा असेल. अमरावतीचा पुढचा खासदार हा कमळ चिन्हावर निवडून आलेला असेल. तसेच बडनेऱ्याचा (Badnera) पुढचा आमदार हाही कमळाचा असेल. अमरावतीचा खासदार आणि बडनेऱ्याचा आमदार हा कमळावर निवडून आलेला असेल. त्यामुळं काही काळजी करू नका, असंही त्यांनी सभेत सांगितलं. यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, बावनकुळे फार सूचक बोलले. कारण नवनीत राणा आणि रवी राणा हे आमच्यासोबत आहेत.
रवी राणा म्हणतात, आम्ही भाजपसोबतच
पुढील अमरावतीच्या खासदार आणि बडनेऱ्याचा पुढील आमदार कमळावर निवडूण येईल, असं म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राणा दाम्पत्याला भाजपची ॲाफर दिलीय. पण बडनेऱ्याचे आ. रवी राणा याबाबत काहीही स्पष्ट बोलायला तयार नाही. “आम्ही भाजपसोबत आहोत. गेली अनेक वर्षे देवेंद्र फडणवीस यांनी मला विधानसभा निवडणुकीत मदत केली. नवनीत राणा यांना लोकसभा निवडणुकीत मदत केली. पण मी युवा स्वाभिमान पक्षात आहे. हा पक्ष अनेक जिल्ह्यात वाढवलाय, असं म्हणत भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढणार का? याबाबत रवी राणा काही स्पष्ट बोलले नाही. रवी राणा म्हणाले, देवेंद्र फडणवीस हे मला मोठ्या भावासारखे आहेत. मी फडणवीस आणि भाजपसोबत आहे. गेल्या दहा वर्षांपासून फडणवीस यांनी मला मदत केली आहे. मी युवा स्वाभीमानी पक्षाचा कार्यकर्ता आहे. भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढणार का, या प्रश्नाला त्यांनी बगल दिली. पण, राणा दाम्पत्यांना बावनकुळे यांनी भाजपची ऑफर दिली. त्यामुळं आता फडणवीस हे बावनकुळे यांना सूचक बोलल्याचं सांगत आहेत.