खारकीवमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल! अमरावतीतील आई-वडील चिंतेत
पालक मुलांसोबत संपर्क होत नसल्याने चिंताग्रस्त झालेले आहेत. आपल्या मुलाला व अडकलेल्या सर्व मुलांना सरकारने तातडीने भारतात परत आणावे, अशी आर्त हाक वडील वैभव गजभिये व आई किरण गजभिये यांनी केली आहे.
अमरावती : युक्रेनमध्ये अमरावतीचे 11 विद्यार्थी अडकलेले होते. त्यापैकी साहिर तेलंग, अभिषेक बारब्दे हे दोनच विद्यार्थी अमरावतीला पोहोचू शकले. मात्र 9 विद्यार्थी अजूनही युक्रेनमध्ये अडकलेले आहेत. अमरावतीचा ऋषभ वैभव गजभिये (Rishabh Vaibhav Gajbhiye of Amravati) हा विद्यार्थी ज्या भागात रशियाने आक्रमण केले त्या खारकिव्ह भागात अडकलेला आहे. वृषभ हा खारकीव येथील VN कराजिया युनिव्हर्सिटीमध्ये (VN Karajia University in Kharkiv) MBBS च्या द्वितीय वर्षाला शिकत आहे. 25 फेब्रुवारीपर्यंत कोणत्याही विद्यार्थ्याने कॉलेज सोडू नये, असा कॉलेजचा आदेश होता. त्यामुळे ऋषभने 26 फेब्रुवारी विमानाचे तिकीट काढलेले होते. मात्र त्यापूर्वीच रशियाने युक्रेनवर हल्ला सुरू केला.
विद्यार्थी दहशतीखाली
ऋषभसह हजारो विद्यार्थी खारकीव्हमध्ये अडकले. काल कर्नाटकचा शेखरआपा नवीन नावाच्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. तो ऋषभच्याच कॉलेजचा विद्यार्थी. ऋषभच्याच हॉस्टेल जवळ फ्रीडम स्क्वेअरवर बॉम्ब टाकण्यात आला. त्याठिकाणी होत्याचे नव्हते झाले. विद्यार्थी दहशतीखाली आले. आता करावे कसे, असा प्रश्न त्यांच्यापुढं उभा ठाकला आहे.
इंटरनेट सेवा बंद
विद्यार्थ्यांकडले पैसे संपले. बर्फ पडायला लागला. तापमानात घट झाली. त्यांची इंटरनेट सेवा ही बंद करण्यात आली. आई-वडिलांना व्हिडिओ कॉल करून मुलांसोबत बोलणे बंद झाले. त्यामुळे पालक मुलांसोबत संपर्क होत नसल्याने चिंताग्रस्त झालेले आहेत. आपल्या मुलाला व अडकलेल्या सर्व मुलांना सरकारने तातडीने भारतात परत आणावे, अशी आर्त हाक वडील वैभव गजभिये व आई किरण गजभिये यांनी केली आहे.