Amravati Crime | शुल्क भरलं नाही म्हणून विद्यार्थ्याचा पेपर हिसकावला; अनिकेतने उचललं आत्मघाती पाऊल, नेमकं काय घडलं?

पाळा येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनं रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याने महाविद्यालयात शुल्क भरलं नव्हतं. त्यामुळं महाविद्यालयानं पेपर सोडवू दिला नाही, म्हणून आत्महत्या केल्याचं विद्यार्थ्याच्या वडिलांचं म्हणणंय. तर त्याला पेपर सोडवू दिलं होतं, असं स्पष्टीकरण महाविद्यालयाच्या वतीनं देण्यात आलंय. कृषी अधिकारी बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांचं स्वप्न यामुळं अधुरचं राहीलं.

Amravati Crime | शुल्क भरलं नाही म्हणून विद्यार्थ्याचा पेपर हिसकावला; अनिकेतने उचललं आत्मघाती पाऊल, नेमकं काय घडलं?
बडनेरा येथे आत्महत्या करणारा विद्यार्थी अनिकेत Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Apr 01, 2022 | 12:54 PM

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील बडनेरा परिसरातील पाळा (Pala in Badnera area) येथील वसुधाताई देशमुख कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी महाविद्यालयात (Vasudhatai Deshmukh College of Food Technology College) बी टेकच्या अंतिम वर्षाला अनिकेत निरगुडवार शिकत होता. मूळच्या यवतमाळ जिल्ह्यातील अनिकेत निरगुडवार (Aniket Nirgudwar from Yavatmal district) या विद्यार्थ्यांने रात्री गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या मुलाने महाविद्यालयाची फी भरली नाही म्हणून महाविद्यालयाने आपल्या मुलाच्या हातातील पेपर हिसकावून घेतला. माझ्या मुलाने आत्महत्या केल्याचा गंभीर आरोप अनिकेतचे वडील अशोक निरगुडवार यांनी केला आहे. या मुलाच्या आत्महत्ये संदर्भात त्यांनी बडनेरा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. योग्य चौकशी करून कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणी तक्रार दाखल झाली आहे. पुढील तपास करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक बाबाराव अवचार यांनी दिली.

महाविद्यालयाने आरोप फेटाळले

विद्यार्थ्यांच्या आत्महत्या प्रकरणी महाविद्यालयाने आपली बाजू मांडत विद्यार्थ्यांच्या पालकाने केलेले सर्व आरोप फेटाळले. त्याचा पेपर हिसकावला नसून त्याने पेपर दिला असल्याचं महाविद्यालयाच्या उपप्राचार्या वैशाली देशमुख यांनी सांगितलं आहे. यवतमाळ जिल्ह्यातील अनिकेत निरगूडवार असं मृत विद्यार्थ्यांचं नाव आहे. महाविद्यालय प्रशासनावर नातेवाईकांची कठोर कारवाईची मागणी केली आहे. अनिकेत बडनेरा येथील वसुधा देशमुख कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजीमध्ये शिकत होता. मृतकाचे वडील अशोक निरगुडवार यांनी बडनेरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

अनिकेतचं स्वप्न अधुरचं राहीलं

अनिकेत हा शेतकरी कुटुंबातील मुलगा. गेल्या तीन वर्षांपासून बडनेरा येथे शिकतो. तिथं तो भाड्याने रूम करून राहतो. कृषी अधिकारी बनायचं त्याचं स्वप्न होतं. या घटनेने वडिलांना अश्रू अनावर झाले. भविष्यातला त्यांचा आधार निघून गेलाय. काल वडिलांशी अनिकेतचं बोलणं झालं होतं. काँग्रेसचे माजी मंत्री व माजी पालकमंत्री वसुधा देशमुख यांच्या संस्थेतला हा प्रकार आहे. त्यामुळं भाजपचे कार्यकर्ते पोलीस ठाण्यात जमले होते. पोलीस सर्च ऑपरेशन करणार आहेत.

Satish Uke अटक प्रकरण : हे तर भाजपचं बदनाम करण्याचं षडयंत्र, नाना पटोले यांची टीका

Washim Crime | वाशिमच्या रुग्णालयात मेस कामगाराची आत्महत्या, गळफास लावून संपविले जीवन

Bhandara | बलात्कारातून पीडितेने दिला बाळाला जन्म, DNA चाचणीतून मिळाला न्याय, दरमहा पोटगी देण्याचा कोर्टाचा आदेश

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.