Video – अमरावतीमध्ये चोरट्यांनी फोडल्या दोन बँका! तीन चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद
अमरावतीच्या तळवेल गावात मध्यरात्री चोरट्यांनी दोन बँका फोडल्या. लॉकरपर्यंत चोरटे पोहचू शकले नसल्याने कॅश सुरक्षित आहे. पण, हे तीनही चोरटे सीसीटीव्ही कॅमेरेमध्ये कैद झालेत. आता चोरट्यांना शोधण्याचे आवाहन पोलिसांसमोर आहे.
अमरावती : जिल्ह्यातील चांदुरबाजार तालुक्यातील तळवेल (Talvel in Chandurbazar Taluka) गावात मध्यरात्री चोरीचा प्रयत्न करण्यात आला. एकाच रात्री दोन बँका फोडण्यात आल्यात. यात चोरटे कॅश लॉकरपर्यंत पोहचू शकले नाही. त्यामुळं बँकेतील कॅश सुरक्षित आहे. तळवेल गावातील जिल्हा मध्यवर्ती बँक (District Central Bank) व सेंट्रल बँकमध्ये हा चोरीचा प्रकार घडला. यात सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये तीन चोरटे कैद झाले आहेत. चोरट्यांनी दोन्ही बँकेचे बाहेरील गेट तोडले. मात्र, चोरट्यांना आतमध्ये प्रवेश करता आला नाही. त्यामुळं सुदैवाने बँकेतील पैसे सुरक्षित आहेत. चांदूरबाजार पोलीस (Chandurbazar Police) व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस घटनास्थळी दाखल झालेत.
चोरट्यांना अटक करण्याचे पोलिसांसमोर आव्हान
या ठिकाणी तपास सुरू आहे. मात्र एकाच रात्री दोन बँकेत चोरटे चोरी टाकण्यासाठी शिरले. त्यामुळं तळवेल गावात खळबळ उडाली आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेले चोरट्यांना शोधण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे. हे तिन्ही चोर तरुण आहेत. त्यांचे आपसातील बोलणेही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ऐकायला येत आहे.
पाहा व्हिडीओ
अमरावतीमध्ये बँकेत चोरीचा प्रयत्न करताना चोरटे. pic.twitter.com/WqHHnMdvIT
— Govind Hatwar (@GovindHatwar) March 1, 2022
चेहरा झाकून शिरले बँकेत
या चोरट्यांनी स्वतःचे तोंड झाकून ठेवले होते. तोंडाला रूमाल बांधला होता. त्यामुळं त्यांचे चेहरे स्वष्ट दिसत नाही. मोबाईलचा वापर करून ते टार्च मारत आहेत. कॅश कुठे आहे. हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. पण, त्यांना कॅश सापडत नाही. त्यामुळं ते चांगलेच संतप्त झालेले आहेत. ही घटना रात्री दोन वाजून छप्पन्न मिनिटांनी घडली. चोर दुचाकीने आले. बाहेर गाडी ठेवली. त्यामुनंतर ते बँकेत शिरले.