अमरावतीत वाहतूक कोंडी अन् जीवघेणे प्रदूषण! जनजागृतीसाठी परिसर संस्थेनं नेमकं केलंय काय?
अमरावती शहरात खासगी वाहनांची संख्या वाढली आहे. ती कमी करण्यासाठी एसटी बस प्रमाणात धावायला पाहिजे. यासाठी परिसर या संस्थेनं जनजागृती केली. पथनाट्याच्या माध्यमातून लोकांची मतं जाणून घेण्यात आली.
अमरावती : शहराला वाहतूक कोंडी (Amravati city traffic congestion) आणि जीवघेणे प्रदूषण यांचा विळखा बसतोय. त्यावर उपाय म्हणून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकटीकरणाचे धडे अमरावतीकरांना नागपूरस्थित परिसर या संस्थेने दिले. त्यासाठी अमरावती शहरात बसयात्रा काढण्यात आली होती. नागरिकांकडून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था हवी (Public transport required) असल्याबाबत मागणीपत्र भरून घेण्यात आले. शहरात इर्विन चौक, माल टेकडी, राजकमल चौक, दसरा मैदान (Irwin Chowk and Dussehra Maidan) या मार्गाने काढण्यात आली. याअंतर्गत इर्विन चौक व दसरा मैदान येथे पथनाट्य करण्यात आले. अमरावती शहरात खासगी वाहनांची संख्या वाढली आहे. ती कमी करण्यासाठी एसटी बस प्रमाणात धावायला पाहिजे. यासाठी परिसर या संस्थेनं जनजागृती केली. पथनाट्याच्या माध्यमातून लोकांची मतं जाणून घेण्यात आली.
साडेसात लोकसंख्येसाठी किती बस हव्यात
या पथनाट्याच्या माध्यमातून लोकांच्या सिटी बसविषयीच्या अपेक्षा जाणून घेण्यात आल्या.अमरावतीचे विपीन तातड यांनी रॅपमधून अमरावतीची लोकसंख्या व बसची संख्या याचे गुणोत्तर आणि यामुळे होणारे प्रवाशांचे हाल मांडले. साडेसहा लाख लोकसंख्येसाठी सुमारे 325 बस अमरावती शहरात धावायला हव्यात. तथापि, अवघ्या 25 बस शहरातील शहरातील रस्त्यांवर धावत आहेत असं यात सांगण्यात आलंय.
नागरिकांच्या अपेक्षा जाणून घेतल्या
कोरोनाकाळात बस बंद झाल्यानं खासगी वाहतूक व्यवस्था वाढीस लागली. राज्यातील बससेवा सक्षम करण्यासाठी लाख को पचास हा मोहीम परिसर या संस्थेनं सुरू केली. याचा अर्थ पाच हजार लोकसंख्येसाठी एक सार्वजनिक बस शहरात हवी. ही मोहीम सस्टेनेबल अर्बन मोबिलीटी नेटवर्क अंतर्गत सुरू करण्यात आली. पथनाट्याच्या माध्यमातून शहर बसविषयी नागरिकांच्या अपेक्षा जाणून घेण्यात आल्या. यावेळी माजी मंत्री सुनील देशमुख, नॅकच्या सदस्या स्मिता देशमुख, सामाजिक कार्यकर्त्या गुजंन गोळे हे उपस्थित होते.