Osmanabad Accident : उस्मानाबादेत देवदर्शन करून निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला, भीषण अपघातात 2 ठार, 10 जखमी

भूम तालुक्यातील नळी वडगाव येथील भाविक शिखर शिंगणापूर येथील कावड यात्रा करून पिक-अप वाहनाने गावाकडे परतत होते. परंडा सोनारी रोड खानापूर पाटीजवळ त्यांचे पिक-अप वाहन आणि ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची धडक बसून भीषण अपघात झाला. यामध्ये 2 जण ठार तर 10 जण गंभीर जखमी झाले.

Osmanabad Accident : उस्मानाबादेत देवदर्शन करून निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला, भीषण अपघातात 2 ठार, 10 जखमी
उस्मानाबादेत देवदर्शन करून निघालेल्या भाविकांवर काळाचा घालाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 14, 2022 | 8:37 PM

उस्मानाबाद : शिखर शिंगणापूर येथून देवदर्शन करून निघालेल्या भाविकांचे पिक-अप वाहन आणि उस वाहतूक करणारा ट्रॅक्टर यांच्यात धडक झाल्याने 2 भाविकांचा मृत्यू (Death) झाला. तर 10 जण जखमी (Injured) झाले. हा अपघात (Accident) परंडा सोनारी रोडवर खानापूर शिवारातील कॅनाल जवळ घडला. जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. हे सर्व जण भूम तालुक्यातील नळी वडगााव येथील रहिवासी आहेत. मंगेश आत्माराम गायकवाड (27) आणि शुभम अंकुश झिटे (19) अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच परंडा पोलीस ठाण्याचे पोलिस निरिक्षक सुनिल गिड्डे, सहाय्यक पोलिस उप निरिक्षक जगताप यांच्या पथकाने घटना स्थळी धाव घेतली. (Two killed 10 injured in pickup vehicle and tractor accident in Osmanabad)

कावड यात्रा करुन घरी परतत होते भाविक

भूम तालुक्यातील नळी वडगाव येथील भाविक शिखर शिंगणापूर येथील कावड यात्रा करून पिक-अप वाहनाने गावाकडे परतत होते. परंडा सोनारी रोड खानापूर पाटीजवळ त्यांचे पिक-अप वाहन आणि ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची धडक बसून भीषण अपघात झाला. यामध्ये 2 जण ठार तर 10 जण गंभीर जखमी झाले. वैभव भोजने, शुभम थिटे, प्रतिक भोजने, स्वप्नील भोजने, विनोद लोकरे, नवनाथ हारनोळ, रोहित इनामदार, बिरूदेव हजारे, श्रीकृष्ण झेंडरे, नवनाथ शोगे, दादा कांबळे अशी जखमींची नावे आहेत. जखमींपैकी काहींना पुढील उपचारासाठी बार्शी येथील रुग्णालयात तर काहींना परंडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी परंडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Two killed 10 injured in pickup vehicle and tractor accident in Osmanabad)

इतर बातम्या

Osmanabad : पुरात वाहून गेलेल्या तरुणाचा तब्बल 6 महिन्यांनी कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह

Roha Suicide : रोह्यात आरोपीची पोलिस स्टेशनमधील लॉकअपमध्ये गळफास घेऊन आत्महत्या

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.