अमृता फडणवीसांचं व्हॅलेंटाईन स्पेशल गीत, नवा लूकही चांगलाच चर्चेत

आज व्हलेंटाईन दिनानिमित्त अमृता फडणवीस यांनी आपल्या नव्या गाण्याची घोषणा केलीय. महत्वाची बाब म्हणजे या गाण्यात त्या एका नव्या रुपात प्रेक्षकांसमोर येणार असल्याचं त्यांच्या ट्वीटमधून पाहायला मिळत आहे.

अमृता फडणवीसांचं व्हॅलेंटाईन स्पेशल गीत, नवा लूकही चांगलाच चर्चेत
अमृता फडणवीस
Follow us
| Updated on: Feb 14, 2022 | 11:16 PM

मुंबई : विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. राजकीय स्थितीवर परखड मत व्यक्त करतानाच विविध नवनवीन गाणी त्या आपल्या चाहत्यांसाठी घेऊन येत असतात. त्यांच्या गाण्यांची कधी प्रशंसा होते, तर कधी त्यांना ट्रोलिंगलाही सामोरं जावं लागतं. मात्र, ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देत त्या आपलं मत आणि व्यक्तिमत्व टिकवून आहेत. आज व्हलेंटाईन दिनानिमित्त (Valentine Day) अमृता फडणवीस यांनी आपल्या नव्या गाण्याची घोषणा केलीय. महत्वाची बाब म्हणजे या गाण्यात त्या एका नव्या रुपात प्रेक्षकांसमोर येणार असल्याचं त्यांच्या ट्वीटमधून पाहायला मिळत आहे.

व्हॅलेंटाईन डे हा प्रेमाचा दिवस म्हणून ओळखला जातो. अमृता फडणवीस यांचंही संगीताप्रति प्रेम आहे. हा दिनाचं औचित्य साधून त्यांनी ट्विटरद्वारे आपल्या नव्या गाण्याची घोषणा केलीय. या ट्वीटमध्ये अमृता फडणवीस यांचा नवा लूक पाहायला मिळतोय. या लूकवरुन हाती त्रिशूळ, अंगावर भगवी वस्त्र आणि गळ्यात रुद्राक्षाच्या माळा अशा रुपात त्या पाहायला मिळणार आहेत. लॉर्ड शिवा अर्थात महादेवाच्या भक्तीवर आधारित त्यांचं नवं गाणं असणार आहे.

अमृता फडणवीसांचे ट्वीट काय?

‘मी तुला निवडले आता आणि कायमचे… माझ्या हृदयात, मनात, आत्म्यात, विश्वासात आणि श्वासात तू आहेस… हा व्हॅलेंटाईन डे जो आपल्या प्रिय व्यक्तीची प्रशंसा करतो… मी माझ्या रुद्र… लॉर्डशिवाला माझी संगीतमय स्तुती अर्पण करते, असं अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय.

इतर बातम्या :

Video : बुलडाण्यातल्या भयानक अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद, एसटी आली आणि उडवून…

Ahmednagar CCTV : व्यावसायिकाच्या डोळ्यांत मिरचीची पूड टाकून लुटण्याचा प्रयत्न, प्रतिकार करताच झाले पसार

मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.