Devendra Fadnavis: ‘जिलेबी कितीही आडवळणी असो..’; देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवशी अमृता फडणवीसांचं खास ट्विट

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून अनेक राजकीय मंडळींसह सर्वसामान्यांनीही त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

Devendra Fadnavis: 'जिलेबी कितीही आडवळणी असो..'; देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवशी अमृता फडणवीसांचं खास ट्विट
Amruta and Devendra FadnavisImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Jul 22, 2022 | 2:17 PM

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून अनेक राजकीय मंडळींसह सर्वसामान्यांनीही त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडवणीस (Amruta Fadnavis) यांनीसुद्धा ट्विट करत त्यांना वाढदिवसाच्या (Birthday) शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी त्यांनी देवेंद्र यांना जिलेबी भरवतानाचा फोटोसुद्धा पोस्ट केला आहे. ‘जिलेबी कितीही आडवळणी असो, तिची चव कायम गोडच असते. अगदी त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी कितीही आडवळणे आली तरी, अडथळ्यांची शर्यत पार करीत, त्यातून सुखद वाट सातत्याने शोधत, कायम विकासाचा गोडवा पसरविणारे देवेंद्र फडणवीसजी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा’, अशा शब्दांत त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

अमृता फडणवीस यांचं ट्विट-

‘जिलेबी कितीही आडवळणी असो, तिची चव कायम गोडच असते. अगदी त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी कितीही आडवळणे आली तरी, अडथळ्यांची शर्यत पार करीत, त्यातून सुखद वाट सातत्याने शोधत-कायम विकासाचा गोडवा पसरविणारे देवेंद्र फडणवीसजी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा,’ असं ट्विट अमृता यांनी केलं आहे.

महाराष्ट्राचे उत्साही उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे आमचे अमूल्य सहकारी देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. देवेंद्रजी हे तळागाळाशी जोडलेले नेते असून लोकांची सेवा करण्याच्या प्रयत्नांसाठी त्यांचं कौतुक केलं जातं. त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना, असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं. राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार एकनाथ खडसे यांनीसुद्धा फडणवीसांना शुभेच्छा दिल्या आहेत. ‘राज्याचे उपमुख्यमंत्री ना. श्री देवेंद्र फडणवीसजी, वाढदिवसानिमित्त आपले हार्दिक अभीष्टचिंतन’, असं ट्विट करत खडसेंनी शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही आज वाढदिवस आहे. त्यांच्यावरही सोशल मीडियाद्वारे शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे.
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद.
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी.
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस.
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे.
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य.
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.