मामेरू विधीने सुरु झाला अनंत आणि राधिका यांचा लग्नसोहळा, काय आहे हा विधी?

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट हे दोघे 12 जुलै रोजी विवाह बंधनात अडकले जाणार आहेत. अनंत आणि राधिका यांच्या लग्नाचे विधी सुरू झाले आहेत. 3 जुलैपासून अंबानी हाऊसमध्ये हे विधी सुरु झाले. याची सुरवात 'मामेरू' विधीने झाली. काय आहे हा 'मामेरू' विधी?

मामेरू विधीने सुरु झाला अनंत आणि राधिका यांचा लग्नसोहळा, काय आहे हा विधी?
anant ambani and radhika merchantImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Jul 04, 2024 | 9:23 PM

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाची मोठ्या धुमधडाक्यात तयारी सुरू आहे. या जोडीचे पहिले आणि दुसरे प्री-वेडिंग सेलिब्रेशन गुजरातच्या जामनगरमध्ये झाले. तर, तिसरे सेलिब्रेशन 5 स्टार लक्झरी क्रूझवर आयोजित करण्यात आले होते. 12 जुलै रोजी अनंत आणि राधिका यांचे लग्न होणार आहे. मात्र, लग्नाआधीच्या विधींना अंबानी हाऊसमध्ये सुरुवात झाली आहे. यातील पहिल्या विधीचे ‘मामेरू’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सोशल मीडियावर या विधीचे फोटो खूप व्हायरल होत आहेत. यामध्ये राधिका आणि अनंत तसेच घरातील सर्व सदस्य खूपच सुंदर दिसत आहेत.

अनंत आणि राधिका यांच्या मामेरू समारंभासाठी नीता अंबानी यांची आई पूर्णिमा दलाल आणि त्यांची बहीण ममता दलाल आल्या होत्या. कुटुंबातील इतर सदस्यही या विधीत सहभागी झाले होते. त्याची एक झलक सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या छायाचित्रांत पाहायला मिळते. त्यामुळे मामेरू सोहळा म्हणजे काय? असा प्रश्न अनेकांच्या मनात आला आहे.

मामेरू विधी म्हणजे काय?

गुजरातीमध्ये मामेरू म्हणजे मामा अर्थात आईचा भाऊ. या विधीमध्ये वधू आणि वराचे मामा त्यांच्या क्षमतेनुसार भेटवस्तू आणतात आणि जोडप्याला आशीर्वाद देतात. या विधीमध्ये आईच्या कुटुंबाकडून भेटवस्तू येतात म्हणूनच त्याला मामेरू म्हणतात. काही ठिकाणी हा विधी मोसालू म्हणूनही ओळखला जातो. कारण या विधीमध्ये वधू, वरांचे मामा आणि मावशी दोघेही मिठाई आणि भेटवस्तू घेऊन येतात. ही परंपरा अनेक राज्यांमध्ये पाळली जाते. ज्यामध्ये मुलगा आणि मुलीच्या लग्नात आईचे कुटुंबीय त्यांच्यासाठी आणि इतर कुटुंबातील सदस्यांसाठी विविध प्रकारच्या भेटवस्तू आणि मिठाई आणतात. पण, प्रत्येकामध्ये तो वेगळ्या नावाने ओळखला जातो.

राधिका हिने मामेरू सोहळ्यामध्ये प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्रा ​​यांनी डिझाइन केलेला क्वीन पिंक कलरचा लेहेंगा परिधान केला होता. ज्यामध्ये राधिका खूपच सुंदर दिसत होती. तसेच, राधिकाने तिचे केस सिल्क स्टाईलने बांधले होते. केसांवर सोनेरी लटकनही तिला शोभून दिसत होते. तर, अनंत अंबानी याने केशरी रंगाचा कुर्ता सेट घातला होता. ज्यासोबत त्याने लाइट शेडचे जॅकेट कॅरी केले होते.

Non Stop LIVE Update
आपले 7-8 मुख्यमंत्री होऊ द्या, त्यात मुस्लिम..,जरांगेंचा सरकारला इशारा
आपले 7-8 मुख्यमंत्री होऊ द्या, त्यात मुस्लिम..,जरांगेंचा सरकारला इशारा.
विधानसभा-लोकसभेत पाठिंबा देणार, आरक्षणाच्या मुद्द्यावर ठाकरे म्हणाले.
विधानसभा-लोकसभेत पाठिंबा देणार, आरक्षणाच्या मुद्द्यावर ठाकरे म्हणाले..
'लाडकी बहीण'वरून उद्धव ठाकरेंचा पहिल्यांदाच बोलले, घरातील बहीण-भावात..
'लाडकी बहीण'वरून उद्धव ठाकरेंचा पहिल्यांदाच बोलले, घरातील बहीण-भावात...
कोकणरेल्वेचा खोळंबा; रूळावर पाणी,एक्स्प्रेस अडकल्या, प्रवाशांची पायपीट
कोकणरेल्वेचा खोळंबा; रूळावर पाणी,एक्स्प्रेस अडकल्या, प्रवाशांची पायपीट.
पनवेलच्या पडघे गावाला पुराचा वेढा, साचलं गुडघाभर पाणी अन् वाहनं गेली..
पनवेलच्या पडघे गावाला पुराचा वेढा, साचलं गुडघाभर पाणी अन् वाहनं गेली...
मला हरभऱ्याच्या झाडावर चढवू नका, वडेट्टीवार काय म्हणाले?
मला हरभऱ्याच्या झाडावर चढवू नका, वडेट्टीवार काय म्हणाले?.
मुख्यमंत्री शिंदेंच्या दरे गावची वाहतूक पूर्णपणे बंद, नेमकं कारण काय?
मुख्यमंत्री शिंदेंच्या दरे गावची वाहतूक पूर्णपणे बंद, नेमकं कारण काय?.
राज्यात मध्यरात्रीपासूनच संततधार, तुमच्या जिल्ह्यात कोणता अलर्ट?
राज्यात मध्यरात्रीपासूनच संततधार, तुमच्या जिल्ह्यात कोणता अलर्ट?.
लाडकी बहीण योजनेचा 'या' महिलांना देखील लाभ, फडणवीसांनी केलं स्पष्ट
लाडकी बहीण योजनेचा 'या' महिलांना देखील लाभ, फडणवीसांनी केलं स्पष्ट.
विठुरायाच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, आजपासून 24 तास...
विठुरायाच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, आजपासून 24 तास....