अंगणवाडी सेविका 1 लाख मोबाईल सरकारला परत करणार, नेमकं कारण काय?

पोषण आहार कार्यक्रमा अंतर्गत 2019 मध्ये अंगणवाडी सेविकांना मोबाईल देण्यात आले होते. या मोबाईल्सचा कालावधी 2021 मध्ये संपला आहे. अशावेळी 2 जीबी रॅमचा मोबाईल दुरुस्तीचा खर्च अंगणवाडी सेविकांकडून वसूल केला जातोय. तसंच 3 हजार पेक्षा अधिक मोबाईलवर इंटरनेटही व्यवस्थित चालत नाही. त्यामुळे अंगवाडी सेविकांनी 1 लाख मोबाईल सरकारला परत करण्याचा निर्णय घेतला आहे.

अंगणवाडी सेविका 1 लाख मोबाईल सरकारला परत करणार, नेमकं कारण काय?
अंगणवाडी सेविका
Follow us
| Updated on: Aug 18, 2021 | 4:22 PM

मुंबई : कोरोना संकटाच्या काळात आपल्या जिवाची बाजी लावून गावागावात जनजागृतीचं काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांनी आता एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील अंगणवाडी सेविका एक लाख सरकारी मोबाईल शासनाला परत करणार आहेत. पोषण आहार कार्यक्रमा अंतर्गत 2019 मध्ये अंगणवाडी सेविकांना मोबाईल देण्यात आले होते. या मोबाईल्सचा कालावधी 2021 मध्ये संपला आहे. अशावेळी 2 जीबी रॅमचा मोबाईल दुरुस्तीचा खर्च अंगणवाडी सेविकांकडून वसूल केला जातोय. तसंच 3 हजार पेक्षा अधिक मोबाईलवर इंटरनेटही व्यवस्थित चालत नाही. त्यामुळे अंगवाडी सेविकांनी 1 लाख मोबाईल सरकारला परत करण्याचा निर्णय घेतला आहे. (Anganwadi worker will return 1 lakh mobiles to the State government)

अंगणवाडी सेविकांना हे मोबाईल 2019 मध्ये पोषण आहार कार्यक्रमा अंतर्गत देण्यात आले होते. मोबाईलमध्ये लाभार्थी यादी, वजन, हजेरी, उंची, स्तनदा माता, गर्भवती महिलाांची माहिती, पोषण आहाराचे वाटप, इत्यादी माहिती नोंद केली जात होती. मात्र, आता या मोबाईलचा कालावधी संपला आहे. अशावेळी मोबाईल दुरुस्तीचा खर्च अंगणवाडी सेविकांकडून वसूल केला जात आहे. तर 3 हजार पेक्षा जास्त मोबाईलवर इंटरनेटही व्यवस्थित चालत नाही. त्यामुळे महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने हा निर्णय घेतला आहे.

इंग्रजी पोषण ट्रॅकर अ‍ॅपवर बहिष्काराचा निर्णय

राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मराठी अ‍ॅप येईपर्यंत इंग्रजी पोषण ट्रॅकर अ‍ॅपवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे, अशा आशयाचं निवेदन एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे प्रकल्प अधिकारी यांना निफाड तालुक्यातील अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने जुनमध्ये देण्यात आले आहे.

एकात्मिक बालविकास सेवा योजनेतंर्गत नाशिक जिल्हयात सुमारे 4000 अंगणवाडी सेविका कार्यरत आहेत. अंगणवाडी केंद्रातील दैनंदिन कामाकरिता अंगणवाडी सेविकांना शासनाकडून मोबाईल देण्यात आले आहेत. शासनाने दिलेल्या मोबाईलमध्ये पोषण ट्रॅकर अ‍ॅप डाऊनलोड होत नाही. त्यामुळे जिल्हा व प्रकल्प कार्यालयाकडून अंगणवाडी सेविकांना व्यक्तीगत मोबाईलवर पोषण ट्रॅकर अॅप डाऊनलोड करण्याची सक्ती केली जाते, तसेच काही वयस्कर अंगणवाडी सेविका अल्प शिक्षित असल्या कारणाने त्यांना इंग्रजी भाषेचे पुरेसे ज्ञान नाही.

पोषण ट्रॅकर अ‍ॅप मराठीतून उपलब्ध करुन देण्याची मागणी

सध्या पोषण ट्रॅकर अ‍ॅपवर मुलांचे, महिलांचे नाव इंग्रजी भाषेत असल्या कारणाने इंग्रजी भाषेत माहिती भरण्यास अडचणी निर्माण होत आहेत. बहूतेक अंगणवाडी सेविकांनी मराठी भाषेतून शिक्षण घेतलं आहे. त्यामुळे त्यांना इंग्रजी भाषेचं पुरेसं ज्ञान नाही, त्यामुळे अडचणी निर्माण होत आहेत. म्हणूनच पोषण ट्रॅकर अ‍ॅप मराठीतून उपलब्ध केले जावे, अशी मागणी अंगणवाडी सेविकांनी निवेदन देऊन केली आहे.

इतर बातम्या :

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुण्यात भाजप-राष्ट्रवादीत पोलखोल स्पर्धा! विकासकामांवरुन आरोपांच्या फैरी

Pooja Sawant : ‘क्षणभर विश्रांती’ घेत अभिनेत्री पूजा सावंत करतेय धमाल, कॅमेऱ्यात टिपलं अमरावती जिल्ह्यातील चिखलदऱ्याचं सौंदर्य

Anganwadi worker will return 1 lakh mobiles to the State government

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.