Anganwadi Workers : सरकारकडून अंगणवाडी सेविकांच्या मानधनाबाबत आनंदाची बातमी

Anganwadi Workers : "लाडकी बहिण योजनेचा कार्यक्रम राष्ट्रपतींच्या उपस्थितीत करण्यात आला. मोदींच्या हस्ते हा कार्यक्रम होता मात्र ते येऊ शकले नाहीत. 5 तारखेला ठाण्यात असा एक कार्यक्रम आखण्यात आला आहे, मात्र पीएमकडून अजून कन्फर्मेशन आलेलं नाही. ते आले तर त्यांची नेहमीच आम्हाला मदत होते" असं आदिती तटकरे म्हणाल्या.

Anganwadi Workers : सरकारकडून अंगणवाडी सेविकांच्या मानधनाबाबत आनंदाची बातमी
Aditi Tatkare
Follow us
| Updated on: Sep 30, 2024 | 2:47 PM

“आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधन वाढीचा प्रस्ताव आम्ही ठेवला. मुख्यमंत्री आणि इतर सर्व मंत्र्यांनी त्याला पाठिंबा दिला. साधारण 50 टक्के वाढ आम्ही केली आहे. मदतनीस आहेत त्यांना 3 हजार अधिक मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला” अशी माहिती अदिती तटकरे यांनी दिली. “आता अंगणवाडी सेविकांना दहा हजार रुपये मिळत होते, त्यात आता 5 हजार अधिक मिळणार आहेत” असं आदिती तटकरे म्हणाल्या.

“मागच्या वेळेस 3 हजार वाढवले होते. मात्र आता पाच हजार वाढवण्यात आलेत. अतिशय परखडपणे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनात वाढ करण्यात आम्हाला आनंद होत आहे. ज्या सेविकांनी लाडकी बहिण योजनेचे फॉर्म भरले त्यांना इन्सेंटिव देखील आम्ही सुरू करत आहोत” असं आदिती तटकरे म्हणाल्या.

‘क्रॉस वेरिफाय करण्यात यावे’

“मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी आपली अग्रेसर मागणी पूर्ण केली आहे. साधारणपणे काल प्रशासनाच्या दृष्टीस ही बाब आली. मी स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. जे 37, 38 अकाऊंट आहेत, ते सिल करण्यात यावे, जे फॉर्म भरण्यात आले ते देखील क्रॉस वेरिफाय करण्यात यावे, जेणेकरून कोणावर अन्याय होणार नाही असे आदेश दिले आहेत” असं आदिती तटकरे म्हणाल्या.

किती कोटी महिलांना लाडकी बहिण योजनेचे पैसे मिळाले?

“आतापर्यंत 1 कोटी 87 लाख महिलांच्या खात्यात लाडकी बहिण योजनेचे पैसे जमा होता आहेत. ज्यांचे फॉर्म काही कारणास्तव मागे राहिले होते, त्यांना तिन्ही महिन्यांचे पैसे आणि ज्यांना आधी 2 महिन्यांचे मिळाले त्यांना या महिन्याचे पैसे मिळतील. गडकरी साहेबांनी नागपूरच्या कार्यक्रमात उलट आमची प्रशंसा केली. ही योजना राबवत असताना गडकरी साहेबांचे मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी मिळाले आहे” असं आदिती तटकरे म्हणाल्या.

आता देशी गाय 'राज्यमाता', राज्य सरकारचा मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय
आता देशी गाय 'राज्यमाता', राज्य सरकारचा मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय.
'काय ही विद्यार्थ्यांची चेष्टा', विरोधकांच्या टीकेवर केसकरांचं उत्तर
'काय ही विद्यार्थ्यांची चेष्टा', विरोधकांच्या टीकेवर केसकरांचं उत्तर.
नितेश राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यावरून शिंदेंच्या मंत्र्याचा निशाणा
नितेश राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यावरून शिंदेंच्या मंत्र्याचा निशाणा.
'लाडक्या बहिणी'चे पैसे हडप, 'त्यानं' 33 जणांचं वापरलं आधारकार्ड अन्...
'लाडक्या बहिणी'चे पैसे हडप, 'त्यानं' 33 जणांचं वापरलं आधारकार्ड अन्....
देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय शरद पवारांची तुतारी हाती घेणार?
देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय शरद पवारांची तुतारी हाती घेणार?.
अजित दादांचे दोन बडे नेते पवारांच्या भेटीला, राजकारणात मोठे बदल होणार?
अजित दादांचे दोन बडे नेते पवारांच्या भेटीला, राजकारणात मोठे बदल होणार?.
जरांगेंची मोठी घोषणा; नारायण गडावर दसऱ्याच्या दिवशी मी भक्त म्हणून...
जरांगेंची मोठी घोषणा; नारायण गडावर दसऱ्याच्या दिवशी मी भक्त म्हणून....
दादांच्या आमदाराने महिला अधिकाऱ्याला दिली निपटविण्याची धमकी, ऐका ऑडिओ
दादांच्या आमदाराने महिला अधिकाऱ्याला दिली निपटविण्याची धमकी, ऐका ऑडिओ.
'शासनाच्या भरोशावर राहू नका, शासन विषकन्या असते'; गडकरी काय म्हणाले?
'शासनाच्या भरोशावर राहू नका, शासन विषकन्या असते'; गडकरी काय म्हणाले?.
'हिंदू अंत करतील, वाकड्या नजरेनं...', नितेश राणेंचं वादग्रस्त वक्तव्य
'हिंदू अंत करतील, वाकड्या नजरेनं...', नितेश राणेंचं वादग्रस्त वक्तव्य.