शरद पवार गटाने उमेदवारी जाहीर केली, पण अनिल देशमुख निवडणूकच लढणार नाहीत?

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत 45 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. या यादीत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना काटोल विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पण अनिल देशमुख यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

शरद पवार गटाने उमेदवारी जाहीर केली, पण अनिल देशमुख निवडणूकच लढणार नाहीत?
अनिल देशमुखImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Oct 25, 2024 | 5:50 PM

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीत काटोल विधानसभा मतदारसंघासाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. पण या मतदारसंघात अनिल देशमुख हेच निवडणूक लढवतील का? याचा निर्णय चर्चेतून सुटणार असल्याचं स्वत: देशमुखांनी म्हटलं आहे. अनिल देशमुख यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्या उमेदवारीबाबत माहिती दिली. “आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये काटोलची उमेदवारी जाहीर करण्यात आली. यानंतर आम्ही सर्व कार्यकर्ते वरिष्ठांशी बोलून ठरवणार आहोती की, अनिल देशमुख लढवतील किंवा सलील देशमुख लढवतील. याचा अंतिम निर्णय हा पक्षश्रेष्ठी ठरतील. यानंतर आम्ही 28 तारखेला फॉर्म भरून त्यादिवशी कोण लढणार हे स्पष्ट करू”, असं अनिल देशमुख यांनी जाहीर केलं.

अनिल देशमुख यांनी यावेळी आपल्या आत्मचरित्रावर आधारीत पुस्तकाविषयी माहिती दिली. “ज्या पद्धतीने मला खोट्या आरोपाखाली अडकवलं होतं त्या पद्धतीचा सर्व उल्लेख पुस्तकात केला आहे. त्यासोबत चांदीवाल आयोगाचा अहवालाचा सुद्धा उल्लेख या पुस्तकामध्ये असणार आहे. पुस्तक लवकरच प्रकाशित होणार आहे. त्यासोबतच या पुस्तकांमध्ये अनेक खुलासे होतील. त्याचबरोबर समाज माध्यमांवरही अनेक खुलास केले आहेत. ते समाज माध्यमांसमोर उपलब्ध आहे”, असं अनिल देशमुख म्हणाले.

बारामतीमधून युगेंद्र पवार यांना उमेदवारी

जयंत पाटील यांनी जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत बारामती विधानसभा मतदारसंघासाठीच्या उमेदवाराचं देखील नाव आहे. बारामतीमधून युगेंद्र पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे बारामतीत काका-पुतण्या यांच्यात बिग फाईट बघायला मिळणार आहे. लोकसभा निवडणुकीवेळीदेखील बारामतीची निवडणुकीत अतिशय चुरशीची ठरली होती. पण त्या निवडणुकीत शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे याच जिंकल्या होत्या. यानंतर आता खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. तर दुसरीकडे युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी स्वत: शरद पवार बारामतीत फिरणार आहेत. त्यामुळे या मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याच्या नजरा लागणार आहेत.

रावसाहेब दानवे यांना चॅलेंज देण्यासाठी शरद पवार गटाच्या उमेदवाराने अर्ज भरला

दरम्यान, जालना जिल्ह्यातून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. जालन्यातील भोकरदन जाफराबाद मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार चंद्रकांत दानवे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून भव्य शक्ती प्रदर्शन करत दानवे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भोकरदन शहरामध्ये मोठ्या संख्येने दानवे यांच्या समर्थकांची गर्दी झाल्याचं दिसून आलं. दरम्यान आजच या गर्दीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचा सुपडा साफ या जनतेने भोकरदन आणि जाफराबादमधून केलाय, असा हल्लाबोल चंद्रकांत दानवे यांनी यावेळी नाव न घेता दानवे पिता-पुत्रांवर केला.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.