Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Anil Deshmukh resigns : अखेर अनिल देशमुख यांचा गृहमंत्रिपदाचा राजीनामा

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची चौकशी होणार असल्याने अखेर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. (anil deshmukh resign as maharashtra home minister)

Anil Deshmukh resigns : अखेर अनिल देशमुख यांचा गृहमंत्रिपदाचा राजीनामा
अनिल देशमुख, माजी गृहमंत्री
Follow us
| Updated on: Apr 05, 2021 | 5:52 PM

मुंबई: महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख (Maharashtra Home Minister Anil Deshmukh resigns ) यांनी अखेर राजीनामा दिला आहे. मुंबई हायकोर्टाने कथित 100 कोटी खंडणीप्रकरणाची चौकशी CBI कडे दिली आहे. त्यानंतर अनिल देशमुख यांनी शरद पवारांना भेटून, त्यांनी राजीनामा दिला. यानंतर अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांचीही भेट घेऊन राजीनामा सोपवला.   (Maharashtra Home Minister Anil Deshmukh resigns) अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर ते मुंबई विमानतळाकडे रवाना झाले. देशमुख हे नागपूरला जाण्याची शक्यता होती, मात्र ते दिल्लीला रवाना झाले.

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. कोर्टाच्या आदेशानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीला अनिल देशमुखही उपस्थित होते. देशमुखांनी पवारांकडे राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर पवारांनी होकार दिला. देशमुख यांनी पवारांकडे राजीनामा दिला असून आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला ते निघाले आहेत. मुख्यमंत्र्यांना भेटून ते त्यांच्या पदाचा राजीनामा देणार आहेत, असं मलिक म्हणाले.

नैतिकतेतून राजीनामा

सीबीआयची चौकशी चालू असताना पदावर राहणं योग्य नसल्याचं सांगून देशमुख यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचंही त्यांनी सांगितलं.

गृहमंत्रीपद मुख्यमंत्र्यांकडे

देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर गृहमंत्रीपदाची सूत्रे मुख्यमंत्र्यांकडे राहणार आहे. नव्या गृहमंत्र्याबाबत शरद पवार निर्णय घेतील, असंही त्यांनी सांगितलं.

राजीनामा पत्रं, जसंच्या तसं

प्रति

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

आदरणीय महोदय

मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी त्यांच्याकडे अॅड. जयश्री पाटील यांच्याद्वारे दाखल याचिकेमध्ये आज दिनांक 05 एप्रिल 2021 रोजी पारित केलेल्या आदेशान्वये त्यांच्या तक्रार अर्जावर सी.बी.आय मार्फत प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश पारित केलेले आहेत.

त्या अनुषंगाने मी मंत्री (गृह) या पदावर राहणे मला नैतिकदृष्ट्य योग्य वाटत नाही. म्हणून मी स्वत :हून या पदापासून दूर राहण्याचा निर्णय घेत आहे.

सबब, मला मंत्री (गृह) या पदावरुन कार्यमुक्त करावे, ही नम्र विनंती

आपला

अनिल देशमुख

आज काय घडलं?

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला होता. मनसुख हिरेन हत्याप्रकरणात नाव आलेले निलंबित API सचिन वाझे यांना अनिल देशमुखांनी महिन्याला 100 कोटी रुपयांच्या वसुलीचं टार्गेट दिलं होतं, असं पत्र परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना दिलं होतं. इतकंच नाही तर परमबीर सिंग यांनी याबाबत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करुन आपण केलेल्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी केली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाकडे वर्ग केलं. त्याचवेळी अॅड जयश्री पाटील यांनीही हायकोर्टात याचिका दाखल करुन अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांच्या चौकशीची मागणी केली होती. हायकोर्टानं अ‌ॅड.जयश्री पाटील यांच्या याचिकेवर निर्णय देताना सीबीआयला प्राथमिक चौकशी करण्यासाठी 15 दिवसांची मुदत दिली आहे. सीबीआला 15 दिवसांमध्ये मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करावी लागणार आहे. मुंबई हायकोर्टानं जयश्री पाटील यांच्या याचिकेवर निरीक्षण नोंदवलं की, अनिल देशमुख हे गृहमंत्री आहेत त्यामुळे पोलिसांकडून याचा निष्पक्ष तपास होऊ शकत नाही. (anil deshmukh resign as maharashtra home minister)

गृहमंत्रीपद कुणाकडे? 

अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर शरद पवार यांचे विश्वासू दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse Patil )हे गृहमंत्रीपदाचा कारभार हाती घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्या निवडीवर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसमधील सूत्रांनी दिली आहे. आज संध्याकाळपर्यंत शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी चर्चा करतील. त्यानंतर उद्या दिलीप वळसे-पाटील तातडीने या खात्याची सूत्रे हाती घेतील, असे समजते.

संबंधित बातम्या:

मोठी बातमी, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपाचा तपास सीबीआयकडे, मुंबई हायकोर्टाचा निर्णय

आधी आबांकडून चार्ज, आता अनिल देशमुखांकडून पदभार? जयंत पाटलांचं नाव गृहमंत्रीपदाच्या रेसमध्ये!

पवारांचे खंदे समर्थक, कागलकरांच्या मनातला ‘हिंदकेसरी’; जाणून घ्या, कोण आहेत हसन मुश्रीफ?

(anil deshmukh resign as maharashtra home minister)

'..तर शिवजयंतीला देशभर सुट्टी द्या',निर्धार मेळाव्यातून ठाकरेंची मागणी
'..तर शिवजयंतीला देशभर सुट्टी द्या',निर्धार मेळाव्यातून ठाकरेंची मागणी.
'ती बाई साधी नाही...मोदींची बहीण, नाव लक्षात ठेवा...', राऊतांचा घणाघात
'ती बाई साधी नाही...मोदींची बहीण, नाव लक्षात ठेवा...', राऊतांचा घणाघात.
'...उनपर है धिक्कार', नाशिकच्या निर्धार शिबिरातून संजय राऊत म्हणाले...
'...उनपर है धिक्कार', नाशिकच्या निर्धार शिबिरातून संजय राऊत म्हणाले....
'चावलेला कुत्रा 'वाघ्या' तर..', मिटकरींची भिडेंवर नाव न घेता खोचक टीका
'चावलेला कुत्रा 'वाघ्या' तर..', मिटकरींची भिडेंवर नाव न घेता खोचक टीका.
अजितदादांनी 2024 ची निवडणूक 'गद्दार'वर लढवली...कामराच्या वकिलांचा सवाल
अजितदादांनी 2024 ची निवडणूक 'गद्दार'वर लढवली...कामराच्या वकिलांचा सवाल.
भिडेंना चावणारं कुत्रं शोधण्यासाठी यंत्रणेची अहोरात्र मेहनत
भिडेंना चावणारं कुत्रं शोधण्यासाठी यंत्रणेची अहोरात्र मेहनत.
संभाजीनगरमध्ये मध्यरात्री 2 गटात राडा
संभाजीनगरमध्ये मध्यरात्री 2 गटात राडा.
सामंत अन् भुमरेंनी घेतली जरांगेंची भेट, कारण काय? काय झाली चर्चा?
सामंत अन् भुमरेंनी घेतली जरांगेंची भेट, कारण काय? काय झाली चर्चा?.
वर्ष अखेरपर्यंत मुंबईकरांच्या सेवेत आणखी एक मेट्रो येणार
वर्ष अखेरपर्यंत मुंबईकरांच्या सेवेत आणखी एक मेट्रो येणार.
ईडी कार्यालयाबाहेर कॉंग्रेसचं आंदोलन; खासदार वर्षा गायकवाड जखमी
ईडी कार्यालयाबाहेर कॉंग्रेसचं आंदोलन; खासदार वर्षा गायकवाड जखमी.