सरकार एसटीच्या संपावर तोडगा काढण्यात अपयशी ठरलं, परबांनी भर विधानपरिषदेत मान्य केलं

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर (St Worker Strike) तोडगा निघाला नाही. या संपवार तोडगा काढण्यास सरकार अपयशी ठरल्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी भर विधानसभेत मान्य केलंय.

सरकार एसटीच्या संपावर तोडगा काढण्यात अपयशी ठरलं, परबांनी भर विधानपरिषदेत मान्य केलं
संपावर तोडगा काढण्यात अपयशी-अनिल परबImage Credit source: Vidhansabha
Follow us
| Updated on: Mar 25, 2022 | 5:44 PM

मुंबई : तीन महिन्यांहून अधिक काळ उलटूनही एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर (St Worker Strike) तोडगा निघाला नाही. या संपवार तोडगा काढण्यास सरकार अपयशी ठरल्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी भर विधान परिषदेत मान्य केलंय. हा घटनाक्रम सांगताना परब म्हणाले, मला युनियनची दुसरी नोटीस (St Worker Notice) आली आहे. आधी मी माझ्यासमोरील मागण्या मान्य केल्या, तरीही या युनियनने मला नोटीस दिली. दिवाळीच्या तोंडावर लोकांना त्रास होऊ नये म्हणून मी कोर्टात गेलो. कर्मचाऱ्यांना संपावर न जाण्यास सांगितलं. दोन वर्षे कोरोनामुळे बोनस दिला नव्हता. मात्र यंदा मी बोनस देण्याचा निर्णय घेतला. हे सगळं सुरू असतान कोर्टाच्या आदेशानंतर एक एक डेपो बंद होत गेला. त्यानंतर मी पुन्हा कोर्टात गेलो, म्हणत परबांनी संप सुरु व्हायच्या आधीपासून ते आतापर्यंतचा पूर्ण घटनाक्रम सांगितलाय.

परबांनी सांगितली हकीकत

या याचिकेवर चर्चा सुरू असताना कोर्टाने समिती नेमून अहवाल द्यायला सांगितला. कोर्टाने जीआर काढायला सांगितला. मी धावपळ करून कोर्टात पोहोचलो. तरीही कोर्टाच्या आदेशानंतर संप सुरू राहिला. एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांची मान्यता मिळावी या मागणीवर समितीने सर्वांचं ऐकून घेतले. या संपाचे नेतृत्व करणाऱ्या खोत आणि पडळकरांशी बोललो. तेव्हा त्यांनी पगारवाढीची मागणी केली. आम्ही तेव्हा विचार केला नाही. आम्ही थेट पगारात पाच हजार वाढवून दिले. ज्यावेळी पगारात एवढी वाढ केली जाते तेव्हा पगार आठ हजारांनी वाढतो. एतिहासात एवढा पगार कधी वाढला नव्हता. असेही परब म्हणाले.

संपवार तोडगा काढण्यात अपयश

तरीही कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम राहिले. यांच्या मागणीचा आम्ही अभ्यास करतो होतो. त्यानंतर पगार शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगाराजवळ नेऊन ठेवला. सरकारने वेळेवर पगाराचीही जबाबदारी घेतली. नोकरीवरून काढण्याचा तर कुणाला प्रश्नच नव्हता. पण तेव्हा दुर्दैवानी पडळकर आणि खोत यांचे प्रयत्न यशस्वी होऊ शकले नाहीत. कामगारांनी नवा नेता निवडूण संप सुरूच ठेवला. शासनाला हे संप मिटवण्यात अपयश आले. असे म्हणत परबांनी पूर्ण हकीकत सांगितली आहे.

धक्कादायक | शाळेला घेऊन जाणाऱ्या वाहनाचा रेडिएटर फुटला, Beed मध्ये दोन विद्यार्थी भाजले

Santosh Bangar यांचा प्रकाश आंबेडकरांवर घणाघात, गेल्या निवडणुकीत पैसे घेतल्याचा आरोप

Pratap Sarnaik ED | संपत्ती जप्तीनंतर पहिल्यांदाच बोलले प्रताप सरनाईक, पत्रकार परिषदेतील 10 मोठे मुद्दे

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.