एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर दिवाळीनंतर सकारात्मक चर्चा करु, अनिल परब यांचे आश्वासन
एसटी कर्मचाऱ्यांचे राज्य शासनात विलीनीकरण आणि अन्य मुद्द्याबाबत दिवाळीनंतर राज्य शासन स्तरावर चर्चा घडवून आणू, असे आश्वासन परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी दिले.
मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचे राज्य शासनात विलीनीकरण आणि अन्य मुद्द्याबाबत दिवाळीनंतर राज्य शासन स्तरावर चर्चा घडवून आणू, असे आश्वासन परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी दिले. आज एसटी कर्मचार्यांच्या मागण्या संदर्भात विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी अनिल परब यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान दोन्ही नेत्यांच्या मध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक चर्चा झाली. त्यानंतर परब यांनी वरील आश्वासन दिले.
कर्मचाऱ्यांनी आपल्या कर्तव्यावर रुजू व्हावे
यापूर्वी एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनसाठी शासनाकडून वेळोवेळी आर्थिक मदत घेऊन त्यांचे पूर्ण वेतन अदा करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच नुकतेच शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे 28 टक्के महागाई भत्ता व घरभाडे भत्ता व दिवाळी भेट एसटी कर्मचाऱ्यांना त्यांच्या वेतनासोबत देण्यात आले, असे परब यांनी दरेकरांना सांगितले. याबाबत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शासनाचे व परिवहन मंत्री महोदय यांचे आभार मानले आहेत. तसेच गेल्या काही दिवसांपासून संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या वर कोणतीही कारवाई करु नका, अशी विनंती देखील त्यांनी परिवहन मंत्र्यांना केली. या बाबतीत बोलताना मंत्री परब म्हणाले की, “आजअखेर अघोषित संपावर असलेल्या कोणते कर्मचाऱ्यावर कारवाई झालेली नाही,” तसेच तातडीने सर्व कर्मचाऱ्यांनी आपल्या कर्तव्यावर रुजू व्हावे व सर्व सामान्य जनतेची गैरसोय टाळावी. असे आवाहन त्यांनी केले आहे.
राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप
मान्यताप्राप्त संघटनांनी एसटी कामगारांची दिशाभूल केल्याचा आरोप करत सांगली आगारातील अनेक कर्मचारी 3 ऑक्टोबरपासून राज्यव्यापी कामबंद आंदोलनावर आहेत. यापूर्वी सर्वच आंदोलक एसटी कामगारांनी नियंत्रकांना निवेदन देत कामबंद आंदोलनाची हाक दिली होती. या आंदोलनात भाजपाचे नेते सहभागी झाले होते. एसटीचे विलिनीकरण झाल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला होता
खूशखबर! पेट्रोल डिझेल स्वस्त होणार; आज मध्यरात्रीपासून नवे दर लागू
नरेंद्र मोदी 5 नोव्हेंबरला केदारनाथला भेट देणार, श्री शंकराचार्य यांच्या पुतळ्याचे करणार अनावरण
पेट्रोल, डिझेलवरील Excise Duty म्हणजे नेमकं काय?, ज्यातून सरकारची दररोज करोडोंची कमाई
India vs Afghanistan T20 world cup 2021: भारताचं यशस्वी कमबॅक, अफगाणिस्तानला 66 धावांनी दिली मातhttps://t.co/8V6yKY0O1C#IndiavsAghanistan | #T20WorldCup | #indiancricket
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 3, 2021