अजित पवार दिल्लीला जाऊन अमित शाह यांना कोणासाठी भेटले…अंजली दमानिया यांचा गौप्यस्फोट काय?

धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराड याला घेऊन दहशत निर्माण केली आहे. विधानसभा निवडणुकीत देखील काहींच्या अंगठ्याला शाई लावून मतदानाचा हक्क बजावण्यास दिला नाही. त्याबाबतचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे दमानिया यांनी म्हटले.

अजित पवार दिल्लीला जाऊन अमित शाह यांना कोणासाठी भेटले...अंजली दमानिया यांचा गौप्यस्फोट काय?
Follow us
| Updated on: Jan 16, 2025 | 7:40 PM

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात चर्चेत आलेले वाल्मिक कराड एसआयटीच्या कस्टडीत आहे. त्याला २२ जानेपर्यंत कस्टडी मिळाली आहे. वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या संबंध असल्याचा आरोप विरोधकांकडून रोज केला जात आहे. त्यावर सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी मोठा आरोप केला आहे. त्या म्हणाल्या वाल्मिक कराड याला धनंजय मुंडे यांची साथ आहे. धनंजय मुंडे यांना अजित पवार यांची साथ आहे. ते लॉबिंग करून आधी छगन भुजबळ, प्रफुल पटेल यांना भेटतात. त्यानंतर दिल्लीला जातात. दिल्लीत अमित शाह यांची अजित पवार भेट घेतात. ते कोणासाठी? असा सवाल अंजली दमानिया यांनी उपस्थित केला.

शासकीय बॉडीगॉर्ड कसे मिळाले?

अंजली दमानिया यांनी म्हटले की, धनंजय मुंडे, वाल्मिक कराड यांचा संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये काय संबंध आहे हे मला स्थापित करायचे होते. एक गुन्हेगार प्रवृत्तीचा माणूस वाल्मिक कराड आहे. त्याच्यावर 14 एफआयआर दाखल आहेत. त्यानंतर त्याला शासकीय बॉडीगार्ड मिळतात. कोणाच्या सांगण्यावरून त्याला शासकीय बॉडीगार्ड मिळाले? वाल्मिक कराड याला लाडकी बहीण योजनेचे परळीचा अध्यक्ष बनवले गेले ते आपोआप झाले का? धनंजय मुंडे यांच्या शिफारिशमुळे गुन्हेगार वाल्मिक कराड लाडकी बहिणी योजनेचा अध्यक्ष होतो. यासाठी त्यांचा राजीनामा घ्यावा, असे दमानिया यांनी म्हटले आहे.

पहिला राजीनामा धनंजय मुंडे यांचा घ्या…

संतोष देशमुख यांची हत्या व खंडणी हे दोन वेगळे गुन्हे नाहीतर एकच गुन्हे आहेत. अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांचे अपहरण 28 मे ला झाले होते. त्यावेळेला मकोका का लावला नाही? सातपुडा बंगल्यामध्ये खंडणीची रक्कम निश्चित झाली होती. हा सातपुडा बंगला कोणाचा? असा प्रश्न दमानिया यांनी उपस्थित केला. त्या म्हणाल्या, या सर्व गोष्टींमध्ये धनंजय मुंडे यांचा रोल मोठा आहे. त्यामुळे पहिला राजीनामा धनंजय मुंडे यांचा घेतला पाहिजे.

हे सुद्धा वाचा

धनंजय मुंडे हे मंत्रिपदावर नसते तर गुन्हेगारी करण्याची वाल्मिक कराड याची हिंमत झाली नसती. एखाद्या सरपंचाला कोणी येऊन मारून जाईल? त्यानंतर राजकीय वरदहस्तामुळे त्यांना न्याय मिळणार नाही का? यामध्ये कुठले राजकारण अन् कुठली लोकशाही? असा प्रश्न अंजली दमानिया यांनी उपस्थित केला.

धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराड याला घेऊन दहशत निर्माण केली आहे. विधानसभा निवडणुकीत देखील काहींच्या अंगठ्याला शाई लावून मतदानाचा हक्क बजावण्यास दिला नाही. त्याबाबतचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे दमानिया यांनी म्हटले.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.