सुलोचना चव्हाण ते सायरस पुनावाला… पद्म पुरस्कारात ‘जय महाराष्ट्र’!

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला 2022 मधील पद्म पुरस्कारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यात सायरस पूनावाला, बालाजी तांबे, प्रभा अत्रे, नटराजन चंद्रशेखरन, डॉ. हिम्मतराव बावसरकर, सुलोचना चव्हाण, सोनू निगम अशा अनेक मराठी नावांचा समावेश आहे.

| Updated on: Jan 26, 2022 | 12:10 AM
प्रभा अत्रे : ज्येष्ठ गायिका प्रभा अत्रे यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रभा अत्रे या किराणा घराण्याच्या गायिका आहेत. त्या अग्रगण्य हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायिकांपैकी एक म्हणून गणल्या जातात. त्या पंडित सुरेशबाबू माने आणि गानहिरा हिराबाई बडोदेकर यांच्या शिष्या आहेत. इतकी वर्ष मी जी संगीताची साधना केली, त्या साधनेचा हा सन्मान असल्याची प्रतिक्रिया प्रभा अत्रे यांनी दिली आहे.

1 / 5
डॉ. बालाजी तांबे : डॉ. बालाजी तांबे यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. तांबे हे आयुर्वेद, योग व संगीतोपचार या विषयांतील तज्ज्ञ तसेच पुणे जिल्ह्यातील कार्ला येथे असलेल्या आत्मसंतुलन व्हिलेजचे संस्थापक होते . बालाजी तांबे यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई, आणि वडील वासुदेव तांबे शास्त्री आहे. बालाजी तांबे यांना लहानपणापासूनच वडीलांनी आयुर्वेद शिकविला. पुढे बालाजी तांबे यांनी आयुर्वेदातली आणि अभियांत्रिकीमधली पदवी एकाच वर्षी मिळविली. आयुर्वेदाचार्य तांबे यांनी आयुर्वेदिक औषधी शास्त्र आणि आयुर्वेदिक फिजिओथेरपी यांवर संशोधन केले आहे.

2 / 5
सुलोचना चव्हाण : सुलोचना चव्हाण यांना देखील पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. सुलोचना चव्हाण या एक प्रसिद्ध गायिका आहेत. त्यांच्या लावण्या या जगप्रसिद्ध आहेत. सुलोचना चव्हाण यांनी आपली पहिली लावणी आचार्य अत्रे यांच्या "हीच माझी लक्ष्मी" या चित्रपटात गायली होती.

3 / 5
 सोनू निगम : सोनू निगम यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. सोनू निगम हे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय पार्श्वगायक आहेत. सोनू निगम यांचा जन्म 30 जुलै 1973 रोजी फरिदाबाद, हरयाणा येथे झाला. चित्रपटांसोबतच त्यांनी स्वतःचे स्वतंत्र अल्बमही केले आहेत. सचिन पिळगावकर यांच्या एका मराठी चित्रपटात त्यांनी गाणे व पाहुण्या कलाकाराची भूमिका केली होती. काही हिंदी चित्रपटांत त्यांनी नायकाच्या भूमिकाही केल्या आहेत. मात्र तरी देखील ते गायक म्हणूनच अधिक प्रसिद्ध आहेत.

4 / 5
सायरस पूनावाला : सायरस पूनावाला यांना पद्म पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. सायरस एस. पूनावाला हे एक भारतीय अब्जाधीश उद्योगपती आहेत. ते सायरस पूनावाला समूहाचे अध्यक्ष असून, या समूहामध्ये सीरम इन्सिट्यूट ऑफ इंडियाचा समावेश होतो. सीरम इन्सिट्यूट ऑफ इंडिया ही जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.