बाबा सिद्दिकी गोळीबार प्रकरणाला नवं वळण, पंजाब कनेक्शन समोर
बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात आता मोठी बातमी समोर आली आहे.
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला. दसऱ्याच्या दिवशी गर्दीचा फायदा घेत त्यांच्यावर तीन हल्लेखोरांनी गोळीबार केला.आता या प्रकरणात पोलिसांनी आणखी एका आरोपीला अटक केली असून, अटक केलेल्या आरोपींची एकूण संख्या बारा झाली आहे.अटक करण्यात आलेल्या या आरोपीचं लुधियाणा कनेक्शन समोर आलं आहे.
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील एका आरोपीला लुधियाना येथून अटक करण्यात आली आहे,लुधियाना पोलीस आणि मुंबई पोलीस यांनी संयुक्त कारवाई करत सुजित कुमार नावाच्या आरोपीला लुधियानाच्या भामिया कला परिसरातून अक केली आहे.बाबा सिद्दिकी यांची रेकी करणारा आरोपी नितीन याच्या बँक खात्यामध्ये पैसे पाठवल्याचा आरोप सुजीत कुमार याच्यावर आहे.मिळत असलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेला आरोपी सुजीत कुमार मुंडिया हा मुंबईचा रहिवासी असून तो आपल्या सासुरवाडीला आला होता.
बाबा सिद्दिकी यांची रेकी करणारा आरोपी नितीन याच्या बँक खात्यामध्ये आरोपी सुजीत कुमार याने 25 हजार रुपये पाठवल्याचा आरोप आहे. आता लवकरच या प्रकरणात पोलीस मोठा खुलासा करण्याची शक्यता आहे. या प्रकरणाबाबत माहिती देताना मुंबई गुन्हे शाखेनं सांगितलं की, या प्रकरणात अटक करण्यात आलेला एक आरोपी राम कनौजिया यांच्या चौकशीतून मोठा खुलासा झाला आहे. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची सुपारी सुरुवातीला राम कनौजिया यालाच देण्यात आली होती, त्याने त्यासाठी एक कोटी रुपयांची मागणी केली होती. तर अटक करण्यात आलेल्या एका आरोपीच्या मोबाईलमध्ये झिशान सिद्दिकी यांचा फोटो देखील सापडला आहे.