AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सणासुदीमुळे नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये गर्दी वाढली; कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण मिळण्याची भीती!

प्रशासनाने सर्व बाजारपेठा खुल्या केल्या आहेत. दुकाने उघडी ठेवण्याच्या वेळेत वाढ केली आहे. त्यामुळे मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये सणांच्या खरेदीला गर्दी होऊ लागली आहे. शिवाय प्रशासनाचे लसीकरण अगदी सुमार चालू आहे. त्यामुळे हि गर्दी तिसऱ्या लाटेला निमंत्रण असून तिसऱ्या लाटेला तडाखा बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सणासुदीमुळे नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये गर्दी वाढली; कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण मिळण्याची भीती!
नवी मुंबई एपीएमसी मार्केट
Follow us
| Updated on: Aug 20, 2021 | 11:12 PM

नवी मुंबई : शहरात कोरोनाची दुसरी लाट ओसरली तरी अनेक दिवसांपासून रुग्णसंख्या एकाच आकड्याच्या भोवती फिरत आहे. प्रशासनाने सर्व बाजारपेठा खुल्या केल्या आहेत. दुकाने उघडी ठेवण्याच्या वेळेत वाढ केली आहे. त्यामुळे मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये सणांच्या खरेदीला गर्दी होऊ लागली आहे. शिवाय प्रशासनाचे लसीकरण अगदी सुमार चालू आहे. त्यामुळे हि गर्दी तिसऱ्या लाटेला निमंत्रण असून तिसऱ्या लाटेला तडाखा बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शहरात डेल्टा प्लस रुग्ण आढळून आल्याने तिसऱ्या लाटेचा सुरुवात झाल्याचे दिसत आहे. शिवाय सध्या तिसऱ्या लाटेतील डेल्टा प्लस व्हेरिएन्टचा धोका लहान मुलांना अधिक असल्याने सुरुवातीलाच काळजी घेणे आवश्यक असणार आहे. आतापासूनच कोरोना नियम पाळणे आवश्यक असल्याचे मत तज्ञ व्यक्त करत आहेत. (Crowd of citizens in Navi Mumbai APMC Market)

शहरात दुसऱ्या लाटेने हाहाकार उडाला होता. एप्रिल आणि मे या दोन महिन्यात रुग्णसंख्येने उच्चांक केला होता. शिवाय रुग्णसंख्या मोठ्या गतीने वाढत होती. शिवाय अदयाप रुग्णसंख्या पूर्णपणे कमी झाली नसल्याने हि गर्दी रुग्णसंख्या वाढीचे कारण बनू शकते. निर्बंध शिथिल झाल्याने लोक सुसाट सुटले आहेत. शिवाय मोठ्या प्रमाणात नियमांचे उल्लंघन होत असून कोरोना संपल्या सारखे वर्तन काही नागरिकांचे दिसत आहे. मास्क न वापरणे अथवा गळ्या खाली वापरणे. काही महाभागांनी तर सामाजिक अंतराचा अर्थच बदलून टाकला आहे. सॅनिटायझर गायब झाले असून अगदी क्वचित ठिकाणी रिकामे स्टॅन्ड आणि बाटल्या दिसत आहे.

लोकांचे योग्य वर्तनच तिसऱ्या लाटेला उत्तर

तिसऱ्या लाटेला थोपवायचे झाल्यास नागरिकांनी स्वयंशिस्त पाळून नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. लोकांचे योग्य वर्तनच तिसऱ्या लाटेला उत्तर असल्याचे सांगण्यात येत आहे. रक्षाबंधन, गणेशोत्सव, दसरा, दिवाळी असे सण येऊ घाल्याने बाजारपेठांवर प्रशासनाचे नियंत्रण गरजेचे आहे. अन्यथा एपीएमसी मार्केटसह नवी मुंबई शहरात रुग्ण संख्या जलदगतीने वाढू शकते. आतापासूनच लोकांनी महत्वाच्या कामासाठीच बाहेर पडावे. मास्कचा वापर कायम ठेवावा. सोशल डिस्टन्स पाळावा, गर्दीच्या समारंभाचे आयोजन टाळावे. सॅनिटायजरचा वापर करावा, तरच शहरात तिसऱ्या लाटेचा संसर्ग कमी प्रमाणात होऊन लहान मुलांसह सर्वांनाच दिलासा मिळू शकतो

नवी मुंबई शहरातील आजपर्यंत कोरोना रुग्णसंख्या

एकूण बाधित रुग्ण : 1 लाख 4 हजार 686 एकूण बरे झालेलले रुग्ण : 1 लाख 1 हजार 952 एकूण मृत्यू संख्या : 1 हजार 873 सध्या उपचार सुरु असलेले रुग्ण : 861 कोरोना तपासणी संख्या : 15 लाख 38 हजार 322

इतर बातम्या : 

पिंपरी-चिंचवड लाचखोरी प्रकरणातील दोषींवर कारवाई करणार, चंद्रकांत पाटलांचा दावा

Zydus Cadila ZyCoV-D Vaccine | भारताच्या आणखी एका स्वदेशी लसीला मंजुरी, आता 12 वर्षावरील सर्वांना लस मिळणार

Crowd of citizens in Navi Mumbai APMC Market

पाकिस्तान बॅकफूटवर, 5 वाजेपासून युद्धविराम, दोन्ही देशांकडून सहमती अन
पाकिस्तान बॅकफूटवर, 5 वाजेपासून युद्धविराम, दोन्ही देशांकडून सहमती अन.
भारत-पाक तणावादरम्यान मुंबईकरांसाठी मोठी बातमी, आता 9 जूनपर्यंत....
भारत-पाक तणावादरम्यान मुंबईकरांसाठी मोठी बातमी, आता 9 जूनपर्यंत.....
मोदी सरकारचा दहशतवादाविरुद्ध मोठा निर्णय, यापुढे तसं कृत्य युद्ध ठरेल
मोदी सरकारचा दहशतवादाविरुद्ध मोठा निर्णय, यापुढे तसं कृत्य युद्ध ठरेल.
भारतीय लष्कराकडून सैन्याच्या शौर्याचा व्हिडीओ शेअर, एकदा बघाच...
भारतीय लष्कराकडून सैन्याच्या शौर्याचा व्हिडीओ शेअर, एकदा बघाच....
VIDEO: पाकच्या रहिम यार खान एअरबेसचा चक्काचूर अन् धावपट्टीही उद्ध्वस्त
VIDEO: पाकच्या रहिम यार खान एअरबेसचा चक्काचूर अन् धावपट्टीही उद्ध्वस्त.
चिनाब नदीवरील सलाल धरणातून पाणी सोडलं, पाकिस्तानात पूर येणार?
चिनाब नदीवरील सलाल धरणातून पाणी सोडलं, पाकिस्तानात पूर येणार?.
पाकिस्तानचा कांगावा, 'तो' दावा खोटा, भारतीय लष्कराने दिला पुरावा
पाकिस्तानचा कांगावा, 'तो' दावा खोटा, भारतीय लष्कराने दिला पुरावा.
ऑपरेशन 'सिंदूर'मध्ये टॉप 5 कमांडरचा खात्मा, पाकिस्तानातून थेट नाव समोर
ऑपरेशन 'सिंदूर'मध्ये टॉप 5 कमांडरचा खात्मा, पाकिस्तानातून थेट नाव समोर.
VIDEO पाकला मोठा हादरा, भारतानं असं उडवलं रावळपिंडीतलं नूर खान एअरबेस
VIDEO पाकला मोठा हादरा, भारतानं असं उडवलं रावळपिंडीतलं नूर खान एअरबेस.
भारताचा मोठा स्ट्राईक, पाकचे 5 एअरबेस उडवले; पाकसाठी किती महत्त्वाचे?
भारताचा मोठा स्ट्राईक, पाकचे 5 एअरबेस उडवले; पाकसाठी किती महत्त्वाचे?.