चित्रकारानं विविध गडकिल्ल्यावरील मातीने साकारलं शिवरायाचं चित्र
ठाण्यातील कोरम मॉल या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या पेटिंग स्पर्धेत एका चित्रकाराने गडकिल्ल्यांवरील मातीने शिवरायांचं चित्र साकारलं आहे.
ठाणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त ठाण्यातील कोरम मॉल या ठिकाणी किल्लेकर्स संस्थेने चित्रकला स्पर्धेचं आयोजन केलं होतं. या स्पर्धेत विक्रमादित्य घाग या चित्रकाराने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विविध गडकिल्ल्यांवरील मातीने शिवरायांचं चित्र साकारलं आहे. या पेंटींगसाठी त्यांना विशेष पारितोषिक देण्यात आलं. या स्पर्धेसाठी शेकडो चित्रकार सहभागी झाले होते. पण चर्चा रंगली ती गडकिल्ल्यांवरील मातीने काढलेल्या चित्राची.
वेगवेगळ्या वयाच्या स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. यंदा शिवजयंतीच्या निमित्ताने किल्लेकर संस्थेने आगळी वेगळी शिवजयंती साजरी केली. शिवरायांची जयंती कोणी रेली काढून, कोणी विविध सांस्कृतिक कार्यक्रम ठेवून तर कोणी चौकाचौकात भगवा ध्वज लावून साजरी करत असतात. पण या संस्थेने पेंटीगच्या माध्यमातून ही शिवजयंती साजरी केली.
या स्पर्धेत सहभागी झालेल्या चित्रकारांनी आपल्या या पेटिंगच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना दिली. महत्त्वाचं म्हणजे या स्पर्धेसाठी १८ व्या वर्षापासून ते ६० वर्षापर्यंतचे स्पर्धेत ही सहभागी झाले होते.