प्रकाश आंबेडकरांना जागा सोडा, मला काहीच नको, ओवेसींचं काँग्रेसला आवाहन

नांदेड : भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांना जागा सोडा, मला काहीच नको, अशी भूमिका घेत एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी पहिल्यांदाच काँग्रेससोबत समन्वयाची जाहीर भूमिका घेतली आहे. नांदेडमध्ये आज एमआयएम आणि भारिप बहुजन महासंघ यांच्या वंचित बहुजन विकास आघाडीची जाहीर सभा झाली. गेल्या काही सभांमधून गायब असलेले असदुद्दीन ओवेसी हे पुन्हा या आघाडीच्या […]

प्रकाश आंबेडकरांना जागा सोडा, मला काहीच नको, ओवेसींचं काँग्रेसला आवाहन
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:39 PM

नांदेड : भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांना जागा सोडा, मला काहीच नको, अशी भूमिका घेत एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी पहिल्यांदाच काँग्रेससोबत समन्वयाची जाहीर भूमिका घेतली आहे. नांदेडमध्ये आज एमआयएम आणि भारिप बहुजन महासंघ यांच्या वंचित बहुजन विकास आघाडीची जाहीर सभा झाली. गेल्या काही सभांमधून गायब असलेले असदुद्दीन ओवेसी हे पुन्हा या आघाडीच्या व्यासपीठावर परतले.

ओवेसी नेमकं काय म्हणाले?

“काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला मी नको असेल, तर मी बाहेर पडतो. तुम्ही बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी बोला. त्यांना हव्या तितक्या जागा द्या, त्यांच्या अटी मान्य करा. मी लोकसभेची एकही जागा लढवणार नाही. वंचित बहुजन आघाडीच्या व्यासपीठावर पण येणार नाही. बाळासाहेबांसोबत तुमची आघाडी झाली, तर मी स्वतंत्र सभा घेऊन त्या आघाडीचे स्वागत करेन.” – असदुद्दीन ओवेसी

ठाकरे, मोदी, फडणवीस हिंदुस्थानाला मजबूत करणार नाहीत, ते फक्त प्रकाश आंबेडकर करतील, असा विश्वास व्यक्त करताना, ओवेसी पुढे म्हणाले, “आम्ही मोदींपासून, ठाकरेंपासून, फडणवीसपासून, पवारांपासून आझादी मागतो आहोत.”

यावेळी असदुद्दीन ओवेसी यांनी काँग्रेसवरही जोरदार निशाणा साधला. “तेलंगाणाच्या निवडणुकीआधी विचारत होते, काही मदत होईल का? आणि आता फक्त प्रकाश आंबेडकरांशी चर्चा करत आहे.”, अशी टीका ओवेसींनी केली.

मी प्रकाश आंबेडकरांसोबत आहे. महाराष्ट्र आणि तेलंगणाच नाही, तर देशातील मुसलमान तुमच्या सोबत आहे, असा विश्वास ओवेसींनी प्रकाश आंबेडकरांना दिला. तसेच, ओबीसी, दलित, मुसलमान समाजातील वंचितांना न्याय मिळाला पाहिजे, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.