दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळ्या घातल्या, इस्लाममध्ये…, ओवैसींचं पहलगाम हल्ल्यावर मोठं वक्तव्य
पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला, या हल्ल्यात अनेक निरपराध लोकांना आपला जीव गमवावा लागला. यावरून पुन्हा एकदा एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी पाकिस्तानला चांगलंच सुनावलं आहे.

पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला, या हल्ल्यात अनेक निरपराध लोकांना आपला जीव गमवावा लागला. यावरून पुन्हा एकदा एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी पाकिस्तानला चांगलंच सुनावलं आहे. काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्याचा सर्वांनी निषेध केला. पाकिस्ताननं अनेकवेळा काश्मीरवर हल्ले केले आहेत, करत आहे. अनेक निरपराध लोक या हल्ल्यांमध्ये मारले जात आहेत. पठाणकोट, वैष्णोदेवी अशा अनेक घटना आपण पाहिल्या आहेत. दहशतवाद्यांनी महिला आणि मुलांना वेगळं केलं, धर्म विचारून गोळ्या घातल्या, निरपराध लोकांना मारणं हे इस्लाममध्ये मोठा गुन्हा आहे, अनेक वर्षांपासून पाकिस्तान दहशतवाद्यांना ट्रेनिंग देत आहे, आयएसआय पाकिस्तानची नाजायज औलाद आहे, असं ओवैसी यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की मी पंतप्रधान मोदींना सांगतो, काश्मीर आमचा भाग आहे, तर काश्मिरी लोक त्याचं अंग आहे. त्यांच्यावर कसा संशय घेऊ शकता? काश्मीरमधील लोकांनी तेथील पर्यटकांना मदत केली. पाकिस्तानची इच्छा आहे, भारतातील हिंदू आणि मुस्लिमांमध्ये फूट पडावी. प्रसारमाध्यमं देखील हिंदू -मुस्लिम वक्तव्य करत आहेत. पण सरकारने योग्य ती कारवाई करावी, सर्जिकल स्ट्राईक, बालकोट, नोटबंदीच्या निर्णयांचं आम्ही कौतुक केलं, आता अशी कारवाई करा, ज्यामध्ये एकाही भारतीयाला आपला जीव गमवावा लागणार नाही, असं अवैसी यांनी म्हटलं आहे.
पाश्चिमात्य देशांच्या घाणीला बळी पडू नका, देशना भाजपचा आहे ना ओवैसींंचा आहे. हा देश 135 कोटी भारतीयांचा आहे. मी मोदी यांना सांगतो की, तुम्हाला वक्फ बिल परत घ्यावेच लागेल. नाही तर तुम्ही केवळ राजकीय म्हणून ओळखले जाताल, मी संसदेमध्ये म्हणालो हा काळा कायदा आहे. एका मोठ्या व्यापाऱ्याने वक्फच्या जमिनीवर घर बांधलं, मोदींनी त्याला फायदा मिळवून देण्यासाठी कायदा आणला, असा आरोपही यावेळी ओवैसी यांनी केला आहे. आमची प्रॉपर्टी घेण्यासाठी हा कायदा आणला, भाजप म्हणते हे बिल आल्याने गरीब मुसलमानांचा फायदा होईल, पण तुमच्या-आमच्या मशिदी हिसकावण्याचा हा प्रयत्न आहे, असंही यावेळी ओवैसी यांनी म्हटलं आहे.