आषाढी एकादशीपूर्वी वारकऱ्यांसाठी गुडन्यूज, राज्य सरकारकडून मिळणार मोठे गिफ्ट

आषाढी एकादशीला दोन दिवस शिल्लक असताना आता राज्य सरकारने वारकऱ्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे.

आषाढी एकादशीपूर्वी वारकऱ्यांसाठी गुडन्यूज, राज्य सरकारकडून मिळणार मोठे गिफ्ट
Follow us
| Updated on: Jul 15, 2024 | 2:26 PM

Ashadhi Ekadashi 2024 : ‘ज्ञानोबा, माऊली, तुकाराम’ अशा जयघोष करत असंख्य वारकरी पंढरीच्या दिशेने रवाना झाले आहेत. विठुरायाच्या नामाचा गजर करत राज्यभरातील लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत. आषाढी एकादशीला दोन दिवस शिल्लक असताना आता राज्य सरकारने वारकऱ्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे. परंपरेनं महिन्याची वारी करणाऱ्या राज्यातील वारकऱ्यांना वृद्धापकाळात वारकरी पेन्शन मिळणार आहे. यामुळे वारकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

माऊलीच्या भक्तीनं न्हाऊन निघालेल्या वारकऱ्यांना राज्य सरकारने आषाढी एकादशीपूर्वी मोठं गिफ्ट दिलं आहे. राज्यातील वारकऱ्यांना आता पेन्शन मिळणार आहे. परंपरेनं महिन्याची वारी करणाऱ्या राज्यातील वारकऱ्यांना वृद्धापकाळात ही वारकरी पेन्शन लागू होणार आहे. या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्री वारकरी महामंडळच्या वतीनं शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. वारकरी महामंडळाचं मुख्यालय हे पंढरपुरात असणार आहे.

आरोग्य विमा कवचही मिळणार

या मुख्यालयात प्रशासकीय सेवेतील अधिकारी किंवा निवृत्त अधिकाऱ्यांची महामंडळावर व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. त्यासोबतच या महामंडळाचं भाग भांडवल 50 कोटी इतके असणार आहे. यासोबतच किर्तनकारांना आरोग्य विमा कवचही दिलं जाणार आहे, असे या शासन निर्णयात म्हटलं आहे.

काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसाळी अधिवेशनात या योजनांबद्दल घोषणा करण्यात आली होती. आता आषाढी एकादशीच्या आधीच शासन निर्णय काढून याबद्दलच्या अंमलबजावणीला सुरुवात करण्यात येणार आहे. त्यामुळे वारकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मुख्यमंत्री वारकरी महामंडळाच्या महत्त्वाच्या योजना कोणत्या?

  • सर्व पालखी मार्गांची सुधारणा, स्वच्छता, आरोग्य, निवारा आणि सुविधा यासाठी दरवर्षी आर्थिक तरतूद करुन त्याचे नियोजन केले जाणार
  • आषाढी आणि कार्तिकी वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांना सुरक्षा, विमा संरक्षण कवच.
  • वारकरी भजनी मंडळाला भजन आणि किर्तन साहित्यासाठी (टाळ, मृदंग, वीणा आदी) अनुदान दिले जाणार
  • किर्तनकारांना आरोग्य विमा, मानधन सन्मान योजना लागू केली जाणार
  • पंढरपूर, देहू, आळंदी, मुक्ताईनगर, सासवड, पिंपळनेर, त्र्यंबकेश्वर, पैठण, कोल्हापूर संस्थान, शेगाव, तारकेश्वर, भगवानगड, अगस्तऋषी, संत सावतामाळी समाज मंदिर, अरण (ता. माढा, जि. सोलापूर) व इतर तीर्थक्षेत्रांचा विकास केला जाणार
  • चंद्रभागा, इंद्रायणी, गोदावरी व इतर नद्या प्रदूषणमुक्त करण्याबाबतची कार्यवाही देखील केली जाणार
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.