AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्याबाबत चर्चा, अशोक चव्हाणांची शरद पवारांसोबत बैठक

मराठा आरक्षण समितीचे प्रमुख आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी शरद पवारांची भेट घेतली. (Ashok Chavan Meeting with Sharad Pawar on Maratha Reservation) 

मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्याबाबत चर्चा, अशोक चव्हाणांची शरद पवारांसोबत बैठक
Follow us
| Updated on: Sep 21, 2020 | 2:28 PM

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. राज्यात ठिकठिकाणी आंदोलन केल्यानंतर मराठा समाजातर्फे आज सोलापुरात आंदोलन केले जात आहे. मराठा आरक्षण आणि आंदोलन या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण समितीचे प्रमुख आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी शरद पवारांची भेट घेतली. (Ashok Chavan Meeting with Sharad Pawar on Maratha Reservation)

यावेळी अशोक चव्हाणांनी मराठा आरक्षणाबाबत पुढील रणनितीबाबत चर्चा केली. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये ही बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थितीत होते. “मराठा आरक्षणाबाबत काही कायदेशीर मुद्दे आहेत. त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबरोबर चर्चा झाली होती. त्याची माहिती शरद पवारांना दिली,” अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी या बैठकीनंतर दिली.

“मराठा आरक्षणावरील स्थगिती उठण्यासाठी जे प्रयत्न सुरु आहेत. त्याची माहिती या बैठकीत शरद पवारांना दिली. त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनीही याबाबत आपली मतं मांडली. सर्वोच्च न्यायालयात जायचं आहे. त्याची तयारी सुरू आहे. त्याबाबत शरद पवारांशी चर्चा केली,” असे अशोक चव्हाण यांनी सांगितले.

“आपण न्यायालयात जातो आहे. घटनापीठ लवकर स्थापन व्हावं यासाठी आपण मुख्य न्यायमूर्तींकडे प्रयत्न करतो आहे,” असेही अशोक चव्हाण म्हणाले.

“लोकल सेवा सुरु करायच्या की बंद ठेवायच्या याचा निर्णय परिस्थितीचा विचार करून घेतला जातो आहे,” असे अशोक चव्हाण यांनी मनसेच्या आंदोलनाबाबत सांगितले.

“कोणत्या नेत्यांना आरक्षण नको आहे, असे भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट करावं. वेगवेगळी विधानं टाळून यात एक वाक्यता असायला हवी,” असेही अशोक चव्हाणांनी सांगितले.

“कृषी विधेयकामुळे शेतकऱ्यांची गळचेपी”

“केंद्र सरकारने मांडलेल्या कृषी विधेयकामुळे शेतकऱ्यांची गळचेपी होतं आहे. मध्यस्थांचा फायदा होतो आहे. याला काँग्रेसचा विरोधचं आहे. पण शिवसेना आणि राष्ट्रवादीने सभात्याग का केला ते त्यांनाच विचारा. राज्यात आम्ही एकत्र आहोत, केंद्रांतही एकत्र असायला हवं होतं. शेतकरी हितासाठी काँग्रेस लढत आहे, तिथे सगळ्यांनी एकत्र येऊन शेतकर्‍यांचे हात मजबूत केले पाहिजेत,” असे अशोक चव्हाण म्हणाले.(Ashok Chavan Meeting with Sharad Pawar on Maratha Reservation)

संबंधित बातम्या : 

Maratha Reservation Agitation Live | खासदार जयसिद्धेश्वर स्वामी यांच्या मठाबाहेर आंदोलन

जनसंपर्कासाठी खासगी संस्थेला 6 कोटी रुपये, उद्धवजी, आतातरी जनतेची दिशाभूल करणं सोडा : चंद्रकांत पाटील

पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था.
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक.
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ.
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून लष्कराचं कौतुक
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून लष्कराचं कौतुक.
पाकमध्ये घुसून दहशतवाद्यांचे अड्डे जमीनदोस्त, हीच ती 9 ठिकाणं जिथं...
पाकमध्ये घुसून दहशतवाद्यांचे अड्डे जमीनदोस्त, हीच ती 9 ठिकाणं जिथं....
भारतीय लष्कराने कसा केला हल्ला, पाहा संपूर्ण घटनाक्रम
भारतीय लष्कराने कसा केला हल्ला, पाहा संपूर्ण घटनाक्रम.
तुझ्या सिंदूरचा बदला... इम्तियाज जलील ऑपरेश सिंदूरवर बघा काय म्हणाले?
तुझ्या सिंदूरचा बदला... इम्तियाज जलील ऑपरेश सिंदूरवर बघा काय म्हणाले?.
जखमी दहशतवाद्यांची भेट घेण्यासाठी पाकिस्तानी अधिकारी रुग्णालयात
जखमी दहशतवाद्यांची भेट घेण्यासाठी पाकिस्तानी अधिकारी रुग्णालयात.
त्यांना आणखी काय बर्बाद करणार?, राज ठाकरेंनी खडेबोल सुनावले
त्यांना आणखी काय बर्बाद करणार?, राज ठाकरेंनी खडेबोल सुनावले.
पिक्चर अभी बाकी है, ऑपरेशन सिंदूरनंतर त्या ट्वीटनं पाकला पुन्हा धडकी
पिक्चर अभी बाकी है, ऑपरेशन सिंदूरनंतर त्या ट्वीटनं पाकला पुन्हा धडकी.