हिरेन मृत्यूप्रकरणाचा उलगडा करणारे ATS प्रमुख IPS शिवदीप लांडे शिवसेना नेत्याचे जावई, वाचा सविस्तर

मनसूख हिरेन प्रकरणाचा उलगडा करणारे एटीएस प्रमुख IPS शिवदीप लांडे हे एका शिवसेना नेत्याचे जावई आहेत, त्यांनी एका शिवसेना नेत्याच्या मुलीसोबत प्रेमविवाह केलाय (ATS chief IPS Shivdeep Lande is son-in-law of shiv sena leader).

हिरेन मृत्यूप्रकरणाचा उलगडा करणारे ATS प्रमुख IPS शिवदीप लांडे शिवसेना नेत्याचे जावई, वाचा सविस्तर
ATS प्रमुख IPS शिवदीप लांडे, त्यांच्या पत्नी ममता आणि त्यांची मुलगी (फोटो सौजन्य : शिवदीप यांचे फेसबुक पेज)
Follow us
| Updated on: Mar 21, 2021 | 8:38 PM

मुंबई : राज्यात गेल्या तीन ते चार आठवड्यांपासून गाजत असलेल्या मनसूख हिरेन मृत्यू प्रकरणाचा अखेर उलगडा झाला आहे. मराठमोळे अधिकारी आणि एटीएस प्रमुख शिवदीप लांडे यांनी स्वत: फेसबूकवर याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान, मनसूख हिरेन प्रकरणाचा उलगडा करणारे एटीएस प्रमुख IPS शिवदीप लांडे हे एका शिवसेना नेत्याचे जावई आहेत, त्यांनी एका शिवसेना नेत्याच्या मुलीसोबत प्रेमविवाह केलाय. त्याच शिवसेना नेता आणि शिवदीप यांच्यातील नात्याविषयी सविस्तर माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत (ATS chief IPS Shivdeep Lande is son-in-law of shiv sena leader).

IPS शिवदीप लांडे यांचे सासरे कोण?

IPS शिवदीप लांडे हे शिवसेना नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांचे जावई आहेत. शिवदीप हे विजय शिवतारे यांच्या कन्या ममता यांचे पती आहेत. विशेष म्हणजे दोघांचा प्रेमविवाह झाला होता. या दोघांची ओळख एका कॉमन फ्रेंडद्वारे एका पार्टीत झाली होती. तिथे त्यांची भेट झाली. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली आणि पुढे काही दिवसांनी या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. त्यानंतर पुढे दोघांनी लग्न केलं. दोघांना एक मुलगी आहे (ATS chief IPS Shivdeep Lande is son-in-law of shiv sena leader).

सासऱ्यांच्या सांगण्यावरुन महाराष्ट्र पोलीस दलात रुजू होण्याचा निर्णय

शिवदीप लांडे हे 2006 च्या IPS बॅचचे अधिकारी आहेत. त्याआधी त्यांनी इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं होतं. त्यानंतर ते यूपीएससीच्या अभ्यासासाठी मुंबईला आले. त्यांच्या प्रयत्नांना यश आले. ते 2006 साली बिहार केडरमध्ये रुजू झाले. तिथे त्यांनी दहा वर्षे काम केलं. या दरम्यान विजय शिवतारे यांची मुलगी ममता यांच्यासोबत त्यांचं 2014 मध्ये लग्न झालं. बिहार पोलीस दलात दहा वर्ष कार्य केल्यानंतर शिवदीप यांचे सासरे विजय शिवतारे यांनी त्यांना महाराष्ट्र पोलीस दलात रुजू होण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्यांनी निर्णयही घेतला. विशेष म्हणजे त्यावेळी शिवतारे हे राज्यात मंत्री होते.

फडणवीस आणि शिवतारेंची केंद्रीय गृहमंत्र्यांना विनंती

शिवदीप यांनी महाराष्ट्र पोलीस दलात रुजू होण्यासाठी केंद्रीय आणि राज्याच्या गृहमंत्र्यांकडे अर्ज केला. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवतारे यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे शब्द टाकला. त्यानंतर अखेर तीन वर्षांसाठी त्यांना महाराष्ट्र पोलीस दलाचे केडर मिळाले.

IPS शिवदीप लांडे यांच्याविषयी आणखी काही महत्त्वपूर्ण माहिती

शिवदीप वामनराव लांडे हे 2006 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत बिहार कॅडरचे अधिकारी असलेले लांडे हे सध्या महाराष्ट्रात कार्यरत आहेत अकोला जिल्ह्यातील परसा गावात शेतकऱ्याच्या पोटी शिवदीप लांडे यांचा जन्म शिक्षणात हुशार, शिष्यवृत्ती मिळवून इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण मुंबईत यूपीएससीचे शिक्षण, बिहार कॅडरमध्ये आयपीएस म्हणून निवड बिहारमधील मुंगेर जिल्ह्यातील नक्षलग्रस्त जमालपूरमध्ये पहिल्यांदा पोस्टिंग पाटणाचे एसपी म्हणून वेगळ्या शैलीमुळे देशभरात प्रसिद्ध शिवसेना नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांचे जावई 44 वर्षीय शिवदीप लांडे दहशतवाद विरोधी पथकाचे पोलिस उपमहानिरीक्षक

संबंधित बातम्या :

मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा अखेर उलगडा, ATS चे DIG शिवदीप लांडे यांची फेसबुक पोस्ट

ATS ला धक्का, मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास NIA कडे सुपूर्द

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.